अमेरिकेत घोंगावतंय मोठं संकट! AIR INDIA नं न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी उड्डाणे केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:57 IST2026-01-24T13:55:46+5:302026-01-24T13:57:34+5:30

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संकटावरून निवेदन जारी केले आहे. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे

Winter Storm Warning in America! AIR INDIA cancels flights to New York, Newark on 25 and 26 january | अमेरिकेत घोंगावतंय मोठं संकट! AIR INDIA नं न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी उड्डाणे केली रद्द

अमेरिकेत घोंगावतंय मोठं संकट! AIR INDIA नं न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी उड्डाणे केली रद्द

नवी दिल्ली - अमेरिकेत संभाव्य विंटर स्टॉर्मच्या इशाऱ्यामुळे एअर इंडियाने न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीहून नेवार्कला येणाऱ्या जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. २५ आणि २६ जानेवारीला ही विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रवाशांची आणि क्रू मेंबरच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे एअर इंडिया प्रशासनाने सांगितले.

एअर इंडियाने प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये म्हटलं की, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर विशेषतः न्यू यॉर्क, न्यू जर्सी आणि आसपासचा परिसर या भागात रविवारी सकाळपासून सोमवारपर्यंत प्रचंड बर्फवृष्टी आणि कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या उड्डाण व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रवासी आणि क्रू कर्मचाऱ्यांची सुरक्षा, सुविधा आणि इतर गोष्टी पाहता २५ आणि २६ जानेवारीला न्यूयॉर्क आणि नेवार्कहून उड्डाण घेणारी विमाने रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या फ्लाईटबाबत अधिक माहितीसाठी एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि कस्टमर सपोर्टशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केले.

अमेरिकेच्या राज्यांमध्ये विंटर स्टॉर्मचा धोका

अमेरिकेत सध्या रेकॉर्डब्रेक हिमवादळाचं संकट आहे. त्यातून हे वादळ सेंट्रल प्लेन्सहून नॉर्थ ईस्टपर्यंत कोट्यवधी लोकांना प्रभावित करू शकते. प्रचंड बर्फवृष्टी, बर्फाचा पाऊस आणि कडाक्याची थंडी या कारणाने परिसरातील रस्ते बंद होतील. वीज पुरवठा खंडीत होऊन प्रवासी वाहतूकही ठप्प होण्याची शक्यता आहे असं राष्ट्रीय हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही या संकटावरून निवेदन जारी केले आहे. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. FEMA पूर्णपणे अलर्टवर आहे. संघ राज्य आणि स्थानिक प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीचा सामान करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. हिमवादळाचा धोका लक्षात घेता अत्यंत गरजेचे काम असेल तरच प्रवास करा असं आवाहन लोकांना करण्यात येत आहे. एअर इंडिया व्यतिरिक्त अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी अमेरिकेतील बाधित भागात उड्डाणे मर्यादित किंवा रद्द केली आहेत.

Web Title : अमेरिका में तूफान! एयर इंडिया ने न्यूयॉर्क, नेवार्क उड़ानें रद्द कीं!

Web Summary : अमेरिका में भयंकर तूफान की चेतावनी के बाद एयर इंडिया ने 25-26 जनवरी को न्यूयॉर्क और नेवार्क के लिए उड़ानें रद्द कर दीं। यात्रियों और चालक दल की सुरक्षा को प्राथमिकता दी गई। तूफान से भारी बर्फबारी और यात्रा में बाधा आने की आशंका है। अन्य एयरलाइनों ने भी उड़ानें सीमित कीं।

Web Title : Air India Cancels Flights to New York, Newark Amid US Storm!

Web Summary : Air India canceled New York and Newark flights on January 25-26 due to a severe winter storm forecast. The airline prioritized passenger and crew safety. The storm threatens the US Northeast with heavy snow and travel disruptions. Other airlines also limited or canceled flights.