शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करणार; पालक संघटना गाऱ्हाणे मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 07:52 IST

गुजरातमधील खाजगी शाळांचा निर्णय, खाजगी शाळांच्या या निर्णयाला अखिल भारतीय पालक संघटनेने विरोध केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सरकारला याप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी साकडे घातले जाईल

अहमदाबाद : जूनपासून शालेय शुल्क चुकते न केलेल्या आणि लवकर शुल्क देण्यास तयार नसलेल्या पालकांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय गुजरातमधील १५ हजार खाजगी शाळांच्या संघटनेने घेतला आहे.

गुजरात स्वयंअनुदानित शालेय व्यवस्थापन संघटनेचे उपाध्यक्ष जतिन भराड यांनी सांगितले की, मुलांच्या शिक्षणाबाबत गंभीर असलेल्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाची भेट घ्यावी. गेल्या सहा महिन्यांपासून शालेय शुल्क न देणाऱ्या आणि भविष्यातही न देणाऱ्या पालकांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय खाजगी शाळांनी घेतला आहे. १५ डिसेंबरपर्यंत या पालकांनी शालेय व्यवस्थापनाची भेट न घेतल्यास त्यांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले जाईल, असे भराड यांनी सोमवारी राजकोट येथे स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या ठरावानुसार सध्या शुल्क देऊ न शकणाऱ्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाला कळविणे जरुरी आहे. तथापि, असे काही पालक आहेत की, ज्यांनी व्यक्तिश: शालेय व्यवस्थपानाची भेट घेतलेली नाही. तसेच शाळेकडून आलेल्या फोनला प्रतिसादही दिलेला नाही. शाळांच्या या आडमुठ्या धोरणामुळे आमच्या पाल्यांची आणि आमची कुचंबणा होत असल्याने याबाबत सरकारने लक्ष घालावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

शाळा पालकांना सक्ती करू शकत नाहीत...खाजगी शाळांच्या या निर्णयाला अखिल भारतीय पालक संघटनेने विरोध केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सरकारला याप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी साकडे घातले जाईल. शुल्क अदा करण्यासाठी शाळा पालकांना सक्ती करून शकत नाही. विशेषत: कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे लोकांना आर्थिक फटका बसलेला असताना अशी सक्ती करू शकत नाही. हा मुलांवर अन्याय आहे, असे संघटनेचे अध्यक्ष नरेश शहा यांनी म्हटले आहे.

अशी केली नंतर सारवासारवयासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर भराड यांनी स्पष्ट केले की, शुल्क भरा म्हणून आम्ही पालकांना सांगत नाहीत. थकीत शुल्काबाबत ज्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले आहे, अशा पालकांच्या मुलांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही. अशा मुलांना ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्यास परवानगी दिलेली आहे. शुल्क न दिलेल्या किंवा भविष्यातही देण्याची तयारी नसलेल्या ५ ते ७ टक्के पालकांसाठी हा निर्णय लागू असेल. काही पालकांनी वर्षभराचे शुल्क भरणार नसल्याचे सांगितेले आहे. अशा पालकांसाठी हा निर्णय आहे, असे भराड म्हणाले.

टॅग्स :GujaratगुजरातonlineऑनलाइनStudentविद्यार्थी