इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:02 IST2026-04-20T14:01:19+5:302026-04-20T14:02:17+5:30

US-Iran talks Update: शस्त्रसंधीची मुदत २२ एप्रिल रोजी संपत असताना आजपासून पाकिस्तानात अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू होणार, अशी माहिती आहे. पण, इराण चर्चेसाठी पाकिस्तान येणार की नाही, याबद्दल अजूनही साशंकता आहे. 

Will Iran Attend? Everything to Know About the US-Iran Talks in Pakistan | इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"

इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"

"माझे प्रतिनिधी इराणसोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानात जात आहेत", असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले आहे. पण, इराणचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही, याबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही. इराणी खासदार इब्राहीम अजीजी यांनी या मुद्द्यावर महत्त्वाचं विधान केलं आहे. "आम्ही अमेरिकेसोबत चर्चा सुरूच ठेवणार आहोत, पण इराणच्या आपल्या मर्यादा आहेत आणि त्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे", असे ते म्हणाले. 

बीबीसी वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार इब्राहीम अजीजी म्हणाले की, "इराणने अमेरिकेसोबत चर्चा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण, याचा अर्थ असा होत नाही की, कोणत्याही किंमतीत चर्चा केली जावी. किंवा दुसऱ्या पक्षाकडून (अमेरिकेकडून) ठेवली जाणारी प्रत्येक अट मान्य केली जावी."

पाकिस्तानात चर्चेसाठी जाणार की नाही?

"अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ पाकिस्तानात पाठवायचे की नाही, हे या गोष्टीवर अवलंबून आहे की, इराणला अमेरिकेकडून सकारात्मत प्रतिसाद मिळतो की नाही. आम्ही कधीही चर्चेपासून पळ काढलेला नाही. आज किंवा उद्या परिस्थितीचा आढावा घेऊ. जर आम्हाला अमेरिकेकडून चांगले संकेत मिळाले, तर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार असू", अशी भूमिका अजीजी यांनी मांडली. 

"इराणने नेहमीच राष्ट्र हिताला प्राधान्य दिले आहे आणि त्या आधारावरच निर्णय घेतले आहे. देशाचे हित आणि देशाची सुरक्षा करण्यासाठी आम्ही सर्वोपरी प्रयत्न करणार आहोत", असेही अजीजी म्हणाले. 

रविवारी (१९ एप्रिल) रात्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत चर्चेसाठी आपले शिष्टमंडळ जात असल्याचे जाहीर केले. 

"माझे प्रतिनिधी मंडळ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला जात आहेत. ते उद्या सायंकाळी (२० एप्रिल) चर्चेसाठी तिथे पोहोचतील", असेही ट्रम्प म्हणाले होते. 

Web Title: Will Iran Attend? Everything to Know About the US-Iran Talks in Pakistan