शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 05:53 IST

कोविड-१९, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ

व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असतानाच राजकीय वर्तुळात या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण आहे ते कोविड-१९ आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ. उत्तर प्रदेश राज्य दिल्ली, पंजाब आणि उत्तराखंडच्या सीमेवर असले तरी राजधानी दिल्लीपासूनही फार दूर नाही. एकदा निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यावर कोविडसंबंधित आचारसंहितेचे पालन करून घेणे निवडणूक आयोगाला कठीण होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा विधानसभेची निवडणूक येत्या ६० दिवसांत घेतली जाणे अपेक्षित आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ती ५ ते ६ टप्प्यांत होईल. 

उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप हा प्रचारात आघाडीवर असून, त्याने जाहिरातींवर कोट्यवधी रूपये खर्च सुरू केला आहे तर आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसही पंजाबमध्ये मागे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर प्रदेशमध्ये दौरे वाढले आहेत. त्यात ते  विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करतात किंवा नव्या प्रकल्पांचे उद्घाटन. या निवडणुकीला त्यांनी किती महत्त्व दिले आहे, हेच यातून दिसते. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी लोकांच्या संपर्कात आहेतच. परंतु, जनतेच्या मनात निवडणुका घेतल्या जाण्याची अनिश्चितता आहे. लॉकडाऊन व निर्बंध लागू केले जातील, याबद्दल ते बोलतात. कारण सरकार आणि त्याच्या यंत्रणा तिसरी लाट हाताळू शकणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे.

लाटेचा कळस फेब्रुवारीत?

राष्ट्रीय कोविड - १९ सुपर मॉडेल समितीचे प्रमुख विद्यासागर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “डेल्टाची जागा ओमायक्रॉन विषाणूने प्रभावीपणे घ्यायला सुरूवात केली की, भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाट निश्चित आहे. ही लाट ओमायक्रॉनमुळे असेल व ती पुढील वर्षाच्या सुरुवातीला येण्याची आणि तिचा कळस फेब्रुवारीत गाठला जाण्याची शक्यता आहे.”
 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग