शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तेज का झाकोळले, महाआघाडीच्या पराभवामागची ४ महत्त्वाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:24 IST

Bihar Assembly Election 2025: राजदने ५२ तिकिटे ही यादव समाजातील उमेदवारांना दिली. यामुळे हा पक्ष जातीयवाद पाळतो, असा आरोप विरोधकांनी जनतेपर्यंत नेला. बिहारमध्ये यादव जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. ही राजदची खरी व्होटबँक आहे.

बिहारमधील महाआघाडीच्या पराभवामागची ४ महत्त्वाची कारणेराजदवर जातीयवादाचा शिक्का घातक ठरलाराजदने ५२ तिकिटे ही यादव समाजातील उमेदवारांना दिली. यामुळे हा पक्ष जातीयवाद पाळतो, असा आरोप विरोधकांनी जनतेपर्यंत नेला. बिहारमध्ये यादव जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. ही राजदची खरी व्होटबँक आहे. या व्होटबँकेच्या भरवशावर पक्षाने १४४ जागांपैकी ५२ तिकिटे केवळ यादव समाजाला दिल्याने ‘यादव राज’ पुन्हा येणार हा भाजपचा संदेश सर्व थरापर्यंत गेला. परिणामी बिगर यादव, मागास, अतिमागास जाती राजदपासून दूर गेल्या.  मित्रपक्षांना किंमत दिली नाही, फोटोत सर्वत्र तेजस्वीचराजदने काँग्रेस, डावे पक्ष व अन्य छोट्या पक्षांना जागावाटपात किंमत दिली नाही. आपला पक्ष राज्यातील प्रमुख पक्ष आहे, असे राजदने सतत ठसवल्याने महाआघाडीची एकूण रणनीती विस्कळीत झाली. काँग्रेसने गॅरंटी जाहीरनाम्यावर तर तेजस्वीने सरकारी नोकरभरतीवर भर दिला. याने मतदार संभ्रमित झाला. महाआघाडीच्या एकूण प्रचारात तेजस्वीची छायाचित्रेच झळकत होती. त्यात राहुल गांधी किंवा अन्य मित्र पक्षांचे नेते अभावाने आढळत होते. राजदची आश्वासने अवास्तव , ब्लू प्रिंट आलीच नाहीतेजस्वीने प्रचारात सरकारी नोकरी, पेन्शन, महिला सबलीकरण व दारुबंदी याची आश्वासने दिली होती. पण भाजपने सरकारी नोकरी, पेन्शनसाठी पैसा कुठून आणणार, असा सवाल मतदारांपर्यंत पोहचवला. तेजस्वींकडेही याचे उत्तर नव्हते. त्यामुळे मतदारांनाही तेजस्वींची आश्वासने अवास्तव वाटू लागली. राजदची ब्लू प्रिंट ही प्रचाराच्या अखेरच्या दिवसातही आली नाही. ती हवेत विरली. लालूंचा वारसा दाखवणे ही मोठी घोडचूक ठरली तेजस्वी सुरुवातीपासून प्रचार भाषणात आपले वडील लालू प्रसाद यांचा वारसा सांगत होते. ही मोठी राजकीय चूक ठरली. कारण यामुळे भाजपचे नेते लालू व राबडी देवी यांच्या काळातील गुंडगिरी, खंडणी अशा घटनांची उदाहरणे जागोजागी भाषणात देण्यास मोकळे झाले. गोपालगंज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘तेजस्वी हे लालूंनी केलेले पाप लपवत’ असल्याचा आरोप केला. त्यामुळे तेजस्वी यांचा ‘सामाजिक न्यायाचा’ अजेंडा सपशेल अपयशी ठरला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election Debacle: Four Key Reasons for Mahagathbandhan's Defeat

Web Summary : RJD's Yadav focus alienated voters. Alliance partners were sidelined, overshadowed by Tejashwi. Unrealistic promises lacked a solid plan. Highlighting Lalu's legacy backfired, reviving memories of past misdeeds, ultimately costing the Mahagathbandhan the election.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Tejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल