शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 07:11 IST

एनडीए संसदीय पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, जर ते खरे भारतीय असतील तर ते असे म्हणाले नसते की, चीनने भारतीय भूभागावर कब्जा केला आहे. 

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : जवळजवळ दररोज संसदेत गोंधळ घालून आणि घोषणाबाजी करून विरोधकांनी देशासमोर स्वतःला ‘उघड’ केले आहे. जे स्वतःची कबर खोदत आहेत, त्यांना आपण का थांबवावे? विरोधक स्वतःच्या पायावर धोंडा मारत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

एनडीए संसदीय पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, जर ते खरे भारतीय असतील तर ते असे म्हणाले नसते की, चीनने भारतीय भूभागावर कब्जा केला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात संरक्षण क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणा, तसेच पाकविरोधातील कारवाईमध्ये तिन्ही सैन्यदलांमध्ये साधलेली एकात्मता याचीही नेत्यांनी प्रशंसा केली. 

बैठकीत ‘एनडीए’ने मोदींच्या ‘अढळ निर्धार, दृढनिश्चय आणि नेतृत्वाची’ प्रशंसा करत ठराव मंजूर केला. ठरावात म्हटले आहे की, त्यांचा निर्णायक संकल्प, दूरदर्शी नेतृत्व आणि दृढ नियंत्रणाने देशाला दिशा दिली आहे आणि सर्व भारतीयांच्या मनात अभिमान आणि ऐक्याची भावना जागविली आहे.

‘एनडीए’च्या ठरावात तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेखभारतात दहशतवादी हल्ला झाल्यास योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, तेही आपल्या अटींवरच. भारत आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही. दहशतवादाला पाठिंबा देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार यांच्यात फरक करणार नाही. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांनी भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले. ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा घडवून आणल्याचा पश्चाताप विरोधी पक्षांना होत असेल.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस