शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

इतना भरोसा, इतना भरोसा...! PM मोदी गेहलोतांवर एवढे खूश का? दोन्ही हातात 'लड्डू' म्हणत खेळी मोठी चाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:26 IST

पंतप्रधा मोदी यांच्या या वक्तव्याकडे मोठी राजकीय खेळी म्हणणूनही पाहिले जात आहे...

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजस्थानातीलकाँग्रेसवरील राजकीय संकटावरून मुंख्यमंत्री गेहलोत यांना कोपरखळी मारली. 'मी गहलोत यांचे विशेष आभार मानतो. ते सध्या अनेक राजकीय संकटांचा सामना करत आहेत. मात्र असे असले तरी, त्यांनी विकास कामासाठी वेळ काढला आणि रेल्वेच्या या कार्यक्रमात सहभागी झाले. मी त्यांचे स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते राजस्थानातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पंतप्रधा मोदी यांच्या या वक्तव्याकडे मोठी राजकीय खेळी म्हणणूनही पाहिले जात आहे.

गेहलोत सरकार आणि काँग्रेस पायलट प्रकरण पक्षांतर्गत असल्याचे म्हणत त्याकडे दूर्लक्ष करत आहे. मात्र, याच वेळी पीएम मोदी यांनी हे राजस्थान काँग्रेसमधील 'संकट' असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजस्थानातील राजकीय अस्थिरता आणखी वाढू शकते. राजकीय विश्लेषक मोदी यांच्या या वक्तव्याकडे भाजपची जनते समोरील कांग्रेसविरोधातील मोठी चाल म्हणून पाहत आहेत. यामुळेच सीएम गेहलोत यांच्या ओएसडीने पीएम मोदी यांच्या या वक्तव्यावर आणि रेल्वे मंत्र्यांच्या 'सबका विश्वास!' या ट्विटवर काही वेळातच पलटवार केला आहे.

आपला विश्वास हीच माझ्या मित्रत्वाची खरी ताकद - 
मोदी म्हणाले, 'मी गेहलोत यांना सांगू इच्छितो की, आपल्या दोन्ही हातात 'लड्डू' आहेत. आपले रेल्वे मंत्रीही राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही राजस्थानचेच आहेत. दुसरे म्हणजे, जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच व्हायला हवे होते ते आजपर्यंत झाले नाही. पण आपला माझ्यावर एवढा विश्वास आहे, एवढा विश्वास आहे की, आपण ती कामेही माझ्यासमोर ठेवली आहेत. आपला हा विश्वासच माझ्या मित्रत्वाची खरी ताकद आहे आणि आपण एक मित्र म्हणून जो विश्वास दाखवता, यासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे.'


 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस