शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

करुणानिधींचा उत्तराधिकारी कोण? डीएमकेमध्ये गृहकलहाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 13:23 IST

डीएमकेचे सच्चे कार्यकर्ते, नेते आपल्यासोबत असल्याचा अलगिरी यांचा दावा

चेन्नई : तामिळनाडूतील डीएमकेचे नेते  एम. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पक्षाचा उत्तराधिकारी कोण होणार यावर दोन भावांमध्ये सत्ता संघर्ष सुरु झाला आहे. 

करुणानिधी यांचा मोठा मुलगा एम. के. अलगिरी यांनी आज, सोमवारी करुणानिधींच्या समाधीस्थळावर जाऊन डीएमकेचे सच्चे कार्यकर्ते, नेते आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. अलगिरी यांची काही वर्षांपूर्वीच पक्षातून हकालपट्टी केली गेली होती. तर त्यांचे छोटे बंधू स्टॅलिन यांना खुद्द करुणानिधी यांनीच वर्षभरापूर्वी कार्यकारी अध्यक्ष बनविले होते. 

आता अलगिरी यांनी स्वत:ला करुणानिधी यांचा राजकीय वारसदार असल्याचे घोषित केले आहे. यापूर्वी त्यांनी स्टॅलिन यांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे पुढील काही दिवसात डीएमकेमध्ये मोठा सत्तासंघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे डीएमकेची उद्या, मंगळवारी महत्वाची बैठक होणार आहे.

या पार्श्वभुमीवर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले अलगिरी यांना पुन्हा सन्मानाने पक्षात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पक्षात ज्या काही घडामोडी घडल्या, त्याचे आपल्याला वाईट वाटते, असे अलगिरी यांनी सांगितले  आहे. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ पसरविले जात आहेत. तसेच ठिकठिकाणी झळकलेल्या फलकांमध्येही अलगिरी यांनाच भविष्यातील नेत्याच्या रुपात दाखविण्यात येत आहे. यातच डीएमकेचे नेते अलगिरी यांच्या बाबत काहीही बोलण्याचे टाळत आहेत. 

डीएमकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, उद्या पक्षाच्या कार्यकारिणीची सभा बोलावण्यात आली आहे. त्यांच्याकडे भविष्यात पक्षातील पदांबाबत निर्णय घेण्यासाठी 80 दिवसांचा कालावधी आहे.

का झाली होती हकालपट्टी?अलगिरी यांनी 2014 मध्ये भाजपचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि तामिळनाडुच्या एमडीएमके पक्षाचे नेते वायको याची भेट घेतली होती. यावर करुणानिधी प्रचंड नाराज झाले होते. यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यावेळी अलगिरी यांनी सांगितले होते की , आता घरी पोटभरून जेवन करणार आहे.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडू