शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

वाड्रा असो वा मोदी, भ्रष्टाचाराची चौकशी व्हायलाच हवी : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 2:00 PM

भ्रष्टाचार प्रकरणी तुम्ही खुशाल रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करा, पण पंतप्रधान मोदींनी देखील राफेल कराराच्या भ्रष्टाचारावर  उत्तर द्यावे.

नवी दिल्ली -

लोकसभा निवडणुकीचे वातवरण तापत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी तुम्ही खुशाल रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करा, पण पंतप्रधान मोदींनी देखील राफेल कराराच्या भ्रष्टाचारावर  उत्तर द्यावे, अशी मागणी राहुल यांनी चेन्नई येथे विद्यार्थ्यांशी सवांद साधताना केली.  

राफेल करारातील हस्तक्षेपावरून अनेकदा पंतप्रधान मोदी यांचे नाव आले आहे. परंतु मोदींनी त्यावर चकार शब्द काढला नाही. याउलट रॉबर्ट वाड्रा भ्रष्टाचाराच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करत असल्याचे राहुल यांनी चेन्नई येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे. 

सरकारला प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात हस्तक्षेप केल्याचे कागपत्रे समोर आली आहेत. त्यावर मोदी यामध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. मात्र मोदींनी यावर अद्याप मौन बाळगले आहे. मोदी असो वा वाड्रा चौकशी सर्वांचीच व्हायला हवी, असे म्हणत राहुल यांनी मोदींच्या चौकशीची मागणी केली आहे. 

आम्हाला देशाचा मूड बदलायचा आहे. देशाचा कल आर्थिक प्रगतीकडे आहे. परंतु विद्यमान भाजप सरकार आर्थिक प्रगतीवर बोलू इच्छित नसून त्यांचा भर देशात भिती निर्माण करण्यावर असल्याची टीका राहुल यांनी भाजवर केली आहे.   

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीrobert vadraरॉबर्ट वाड्रा