शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

"जब-जब जुल्म, तब-तब जिहाद", महमूद मदानी यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप म्हणाला 'व्हाईट कॉलर दहशतवाद'; काँग्रेसचीही प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 00:40 IST

शनिवारी (29 नोव्हेंबर 2025) भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना, "जेव्हा-जेव्हा अन्याय होईल, तेव्हा-तेव्हा जिहाद होईल," असे विधान मदनी यांनी केले होते.

जमीयत उलमा-ए-हिंदचे (Jamiat Ulema-e-Hind) प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी 'जिहाद' (Jihad) आणि 'तीन तलाक' (Triple Talaq) संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून देशभरातील राजकारण तापले आहे. शनिवारी (29 नोव्हेंबर 2025) भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना, "जेव्हा-जेव्हा अन्याय होईल, तेव्हा-तेव्हा जिहाद होईल," असे विधान मदनी यांनी केले होते. याचवेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयावरही (Supreme Court) टीका केली. मदनी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपपासून ते काँग्रेस, शिवसेना आणि जेडीयूनेही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या 'व्हाइट कॉलर दहशतवादा'च्या... -भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मदनी यांच्यावर समाजात जातीय दंगल भडकावण्याच्या उद्देशाने, असे विधान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "या व्हाइट कॉलर दहशतवादाच्या म्होरक्यांच्या कटापासून आपण सावध राहायला हवे. हे लोक मानवता, देश किंवा कोणत्याही धर्माचे हितचिंतक नाहीत. त्यांचे हे विधान देश आणि देशाच्या सन्मानाप्रती त्यांची विकृत मानसिकता दर्शवते." तसेच, भीती आणि संभ्रम आता उघड होत आहे. त्यांची सांप्रदायिक कट-कारस्थानाची विचारसरणी समाजात विभाजन आणि संघर्ष निर्माण करण्याच्या उद्देशाने आहे, असेही नक्वी म्हणाले.

चुकीच्या इस्लामचा उपदेश देणे थांबवा : काँग्रेसची प्रतिक्रिया -काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी मदनींना थेट प्रश्न केला आहे, "तीन तलाकवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये काय चुकीचे आहे? ते तर कुराण शरीफमध्येही नाही. कृपया आपल्या अनुयायांना चुकीच्या इस्लामचा उपदेश देणे थांबवा. हे हराम आहे."

जेडीयू नेते नीरज कुमार यांनी 'वंदे मातरम' आणि राष्ट्रगीतावर कोणाचीही असहमती असू शकत नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, हा देश सर्वांचा आहे. सर्वांनीच लोकशाही टिकवण्यासाठी आणि स्वतंत्र्य मिळवण्यासाठी आपली भूमिका पार पाडली आहे. या देशाच्या लोकांनी शैक्षणिक संस्था आणि समाजाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजासमोर नतमस्तक होणे हे हिंदुस्थानी समाजाचे लक्षण आहे.

शिवसेना नेत्या शाइना एनसी यांनीही मदनी यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "सुप्रीम कोर्टने मुस्लिम महिलांच्या सन्मानासाठी तीन तलाकवर बाजू मांडली, तर तो निर्णय प्रतिगामी कसा? आपण मुस्लिम समाजाला का भडकावत आहात? अशा ठेकेदारांनी विचारपूर्वक बोलून लोकांना भ्रमित करू नये." 

English
हिंदी सारांश
Web Title : Controversy erupts over Madani's 'Jihad' remark; BJP calls it 'White-Collar Terrorism'.

Web Summary : Mahmood Madani's 'Jihad' statement sparked political outrage. BJP accused him of inciting communal discord, labeling it 'white-collar terrorism'. Congress questioned his teachings on Triple Talaq, while other parties condemned his remarks as divisive and misleading.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIslamइस्लामBJPभाजपाcongressकाँग्रेस