शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कॅबिनेट व राज्यमंत्र्यांमध्ये नेमका काय फरक? अधिकार काय? कोण कोणाला करते रिपोर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 06:59 IST

Narendra Modi Government: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

 नवी दिल्ली  -  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात मंत्रिपदाची विभागणी करताना कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये नेमका काय फरक असतो, त्यांचे अधिकार 
काय असतात, त्यांना वेतन किती मिळते, याबाबत... 

१. कॅबिनेट मंत्री 
- मंत्रालयाचा कॅबिनेट मंत्री हा थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करत असतो. संबंधित मंत्रालयाची जबाबदारी त्याच्याकडे असते.
- कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा त्यापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सोपविलेली असते.
- मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सहभागी व्हावेच लागते.

२. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
- कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात.
- एखाद्या मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते, परंतु त्यांचा दर्जा कॅबिनेटचा नसतो.
- हे राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतातच असे नाही.

- खासदारांना दरमहा १ लाख वेतन मिळते. ७० हजार रुपये भत्ता, ६० हजार कार्यालयीन खर्च, अधिवेशनात दररोज २ हजार रुपये भत्ता मिळतो.
- मंत्र्यांना दरमहा सत्कार भत्ता मिळत असतो. हा भत्ता त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांसाठी खर्च करण्यासाठी असतो.
- कॅबिनेट मंत्र्यांना २.३२ लाख, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) २.३१ लाख, तर राज्यमंत्र्यांना २.३० लाख रुपये मिळतात.

३. राज्यमंत्री
- कॅबिनेट मंत्र्यांच्या मदतीसाठी राज्यमंत्रिपदाची निर्मिती केली आहे. ते कॅबिनेट मंत्र्याना रिपोर्ट करतात.
- एखाद्या मंत्रालयासाठी कामकाजाचा विस्तार पाहता एक किंवा दोन राज्यमंत्री असू शकतात.
- कॅबिनेट मंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री मंत्रालयाची जबाबदारी पाहतात. 
- राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारnarendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीprime ministerपंतप्रधान