ममतांविरोधात लढणाऱ्या शुभेंदू अधिकारींना तृणमुलने बालेकिल्ल्यात घेरले, विरोधात दिला तगडा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 20:39 IST2026-03-17T20:38:49+5:302026-03-17T20:39:49+5:30

West Bengal Election 2026: दोन जागांवरून लढत असलेल्या शुभेंदू अधिकारी यांची त्यांच्या नंदिग्राम बालेकिल्ल्यातच कोंडी करताना तृणमूल काँग्रेसने त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला आहे. तृणमूल काँग्रेसने पबित्र कर यांना नंदिग्राम मतदारसंघातून उमेदवारी देत शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

West Bengal Election 2026: Trinamool surrounded Shubendu Adhikari, who was fighting against Mamata, in a fortress, gave a strong candidate against him | ममतांविरोधात लढणाऱ्या शुभेंदू अधिकारींना तृणमुलने बालेकिल्ल्यात घेरले, विरोधात दिला तगडा उमेदवार

ममतांविरोधात लढणाऱ्या शुभेंदू अधिकारींना तृणमुलने बालेकिल्ल्यात घेरले, विरोधात दिला तगडा उमेदवार

गेल्या काही वर्षांपासून भाजपा आणि ममता बॅनर्जींमधील तीव्र संघर्षामुळे चर्चेत राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यावेळी बंगालचा अवघड किल्ला सर करण्यासाठी कंबर कसून तयार असलेल्या भाजपाने तृणमुलच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बालेकिल्ल्यातच कोंडी करण्यासाठी त्यांच्याविरोधात शुभेंदू अधिकारी यांना भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांनी हा डाव भाजपावरच उलटवणारी खेळी खेळली असून, दोन जागांवरून लढत असलेल्या शुभेंदू अधिकारी यांची त्यांच्या नंदिग्राम बालेकिल्ल्यातच कोंडी करताना त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला आहे. तृणमूल काँग्रेसने पबित्र कर यांना नंदिग्राम मतदारसंघातून उमेदवारी देत शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने मंगळवारी सर्व २९४ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या परंपरागत भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. तसेच त्यांच्यासमोर भाजपाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचं आव्हान असेल. भाजपाने ममता यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी केल्यानंतर तृणमूल काँग्रेसनेही शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधातही हाच डाव खेळा आहे. तसेच नंदीग्राम मतदारसंघामधून शुभेंदू अधिकारी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय असलेल्या पबित्र कर यांना उमेदवारी दिली आहे.

बंगालच्या राजकारणात पवित्र कर हे शुभेंदू अधिकारी यांचे चेले मानले जातात. तसेच त्यांनी मंगळवारीच भाजपामधून तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. तसेच पक्षानेही तातडीने त्यांना शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात नंदिग्राममधून उमेदवारी जाहीर केली. २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र अटीतटीच्या झालेल्या त्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, पबित्र कर हे आधी नंदीग्राम-२ ब्लॉकमधील बोयाल-१ ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले आहेत. तसेच या भागावर त्यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काही महिने आधी ते तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये गेले होते.  

Web Title : शुभेंदु अधिकारी के खिलाफ तृणमूल का मजबूत उम्मीदवार, नंदीग्राम में घेराबंदी।

Web Summary : बंगाल चुनाव में गरमाहट। टीएमसी ने शुभेंदु अधिकारी के खिलाफ पवित्र कर को नंदीग्राम से उतारा, भाजपा की ममता बनर्जी को चुनौती देने की चाल का जवाब। कर, अधिकारी के पूर्व सहयोगी, हाल ही में टीएमसी में शामिल हुए, जिससे मुकाबला कड़ा हो गया है।

Web Title : TMC counters Suvendu Adhikari in Nandigram with strong candidate.

Web Summary : West Bengal elections heat up. TMC fields Pabitra Kar against Suvendu Adhikari in Nandigram, countering BJP's move to challenge Mamata Banerjee. Kar, a former Adhikari aide, recently rejoined TMC, setting up a high-stakes battle.