शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

"परवानगीची आवश्यकता नाही, पोलीस आडवतील, तेथेच..."; राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांचं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:45 IST

"बंगाल भाजप ओबीसी मोर्चा याविरोधात आवाज उठवेल आणि रामनवमीनंतर रस्त्यावर उतरेल..."

पश्चिम बंगालमध्ये ओबीसी प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंदर्भात विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील ममता सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हे सर्वेक्षण असंवैधानिक असून राज्य सरकार केवळ मुस्लीम समाजावर लक्ष केंद्रित करून हे सर्वेक्षण करत आहे. हे न्याय्य नाही, असे अधिकारी यांनी म्हटले आहे.

बंगाल भाजप ओबीसी मोर्चा याविरोधात आवाज उठवेल आणि रामनवमीनंतर रस्त्यावर उतरेल -पत्रकार परिषदेत बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, "ओबीसी यादीत अनेक समुदायांना बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आले होते, जे उच्च न्यायालयाने फेटाळले. याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता, तीन महिन्यांत पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकार सर्व समुदायांचे सर्वेक्षण करण्याऐवजी केवळ मुस्लीम समुदायावर लक्ष केंद्रित करत आहे. बंगाल भाजप ओबीसी मोर्चा याविरोधात आवाज उठवेल आणि रामनवमीनंतर रस्त्यावर उतरेल. तसेच, पुढील सोमवारी अथवा मंगळवारी उच्च न्यायालयातही जाईल."

"पोलीस जेथे अडवतील, तेथे रामनवमी उत्सव साजरा केला जाईल" -रामनवमी उत्सवासंदर्भातील प्रशासनाच्या धोरणावरूनही सुवेंदू अधिकारी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सुवेंदू म्हणाले, "मिरवणूक काढण्यासाठी कुणाच्याही परवानगी आवश्यकता नाही. पोलीस जेथे अडवतील, तेथेच रामनवमी उत्सव साजरा केला जाईल. घरांमध्ये, रस्त्यावर, नदीकाठी, डोंगरांवर सर्वत्र प्रभू रामचंद्रांची पूजा केली जाईल. आम्ही हिंदू समाजासोबत हाती झेंडे घेऊन 'जय श्री राम'चा जयघोष करत बाहेर पडू." एवढेच नाही तर, 'जो हिंदू हित में काम करेगा, वही बंगाल में राज करेगा,' असेही सुवेंदू यावेळी म्हणाले.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालRam Navamiराम नवमीBJPभाजपा