शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी वापरणाऱ्या रेंज रोवर ऐवजी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत सफेद टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये बसले.

नवी दिल्ली - रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन २ दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता पुतिन यांचं विमान दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले. ज्याठिकाणी तिथे उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. या दोन्ही नेत्यांना एकमेकांना अभिवादन करत गळाभेट घेतली. 

एअरपोर्टवर औपचारिक भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादीमीर पुतिन यांनी जे पाऊल उचलले त्याची कुणी कल्पना केली नव्हती. दोघेही जागतिक नेते, हायटेक सुरक्षा आणि त्याच सफेद रंगाची टोयोटा फॉर्च्यूनर, ज्यात दोन्ही नेते बसले आणि पालम एअरपोर्टवरून पंतप्रधान निवासस्थानी रवाना झाले. 

का होतेय फॉर्च्यूनरची चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी वापरणाऱ्या रेंज रोवर ऐवजी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत सफेद टोयोटा  फॉर्च्यूनरमध्ये बसले. हा नजारा वेगळा होता कारण कुणालाही ती अपेक्षा नव्हती. सेफ्टी प्रोटोकॉलवर या प्रकारे सगळेच हैराण झाले. पुतिन मोदी भेटीनंतर अचानक सोशल मीडियावर या SUV कारची चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षा यंत्रणा अनेकदा व्हीआयपी हालचालींसाठी पांढऱ्या फॉर्च्युनर वापरतात. कारण हे मॉडेल सरकारी ताफ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या कारची स्थिरता आणि ग्राउंड क्लीयरन्स उत्तम आहे. भारतात देशातील अनेक दिग्गज नेते, सेलिब्रिटी या कारचा वापर करतात. दमदार इंजिन आणि खराब रस्त्यांवरही धावण्याची त्यात क्षमता आहे. या कारची २४ एप्रिल २०२४ रोजी मुंबई (मध्य) आरटीओमध्ये नोंदणी झाली. पहिल्या मालकाचे नाव A*D* *O*M*S*I*N*R*O*...*O*I*E*M*M*A* असे दिले आहे. ती एसपीजी किंवा महाराष्ट्र पोलिसांची कार असू शकते, जी केंद्रीय यंत्रणेत समाविष्ट करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राशी कनेक्शन

विशेष म्हणजे ज्या कारमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली नेते व्लादीमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी बसले होते त्या कारचे महाराष्ट्र कनेक्शन पुढे आले आहे. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर MH01 EN 5795 आहे. ही टोयोटा फॉर्च्यूनर सिग्मा मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट होते. हे वाहन BS-VI मानक असून एप्रिल २०२४ मध्ये नोंदणी झालेली आहे २०३९ पर्यंत तिचे फिटनेस सर्टिफिकेट उपलब्ध आहे. ही फॉर्च्युनर ना पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील आहे ना पुतिन यांनी या कारचा कधी उपयोग केला आहे. सामान्यत: राष्ट्रपती पुतिन जेव्हा परदेशात दौरा करतात तेव्हा ते अत्याधुनिक सुरक्षेसाठी Aurus Senat कारमधून प्रवास करतात. ही कार रशियाचे राष्ट्रपती यांची अधिकृत स्टेट लिमोजीन कार आहे. जी जगभरात दमदार सेफ्टीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु दिल्लीत पुतिन यांनी भारतीय फॉर्च्यूनर कारमध्ये प्रवास केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin-Modi's Surprise Ride: White Fortuner's Maharashtra Connection Explained

Web Summary : Putin's India visit saw him and Modi riding in a white Fortuner, sparking discussion. Registered in Mumbai, the car's Maharashtra connection intrigues. Usually, Putin uses his Aurus Senat, but this time, he opted for an Indian vehicle.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशिया