चेन्नई: २३ एप्रिल रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर, सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अभाअद्रमुक) यांसह राजकीय पक्षांनी स्ट्रॉंग रूमवर २४ तास पाळीपाळीने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदान झाल्यानंतर, निवडणूक आयोगाने आता ४ मे रोजी मतमोजणी होईपर्यंत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल्स (व्हीव्हीपॅट) स्ट्रॉंग रूममध्ये हलवले आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि तामिळनाडू विशेष पोलिस दलासह अनेक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या असल्या तरी, राजकीय पक्षांनी ईव्हीएमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले कार्यकर्ते तैनात केले आहेत. (वृत्तसंस्था)
सशस्त्र दल केले तैनात
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत आवश्यक कागदपत्रे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व स्ट्रॉंग रूममध्ये सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहे.
कार्यकर्ते २४ तास हजर
अद्रमुकचे कायदेशीर कामकाज विभागाचे सहसचिव आर. एम. बाबू मुरुगवेल यांनी सांगितले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन ठेवलेल्या परिसरात कार्यकर्ते २४ तास उपस्थित राहतील.
ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये हलवले, बहुस्तरीय सुरक्षा
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सीलबंद ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन आणि इतर मतदान साहित्य राज्यभरातील निश्चित मतमोजणी केंद्रांच्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितपणे हलवले. ईव्हीएम मशीन पोलिस आणि सशस्त्र दलांच्या संरक्षणाखाली ६२ मतमोजणी केंद्रांवर नेण्यात आल्या, जिथे ४ मे रोजी सर्व २३४ विधानसभा मतदारसंघांतील मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रांवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांवरील स्ट्रॉंग रूमचे रक्षण केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, तामिळनाडू विशेष पोलिस आणि स्थानिक पोलिस चोवीस तास करतील.
Web Summary : Following Tamil Nadu's assembly elections, parties like DMK and AIADMK are vigilantly guarding strong rooms storing EVMs. Multiple security forces are deployed, but parties have added their own watch to ensure EVM safety until the May 4th vote counting.
Web Summary : तमिलनाडु विधानसभा चुनाव के बाद, द्रमुक और अन्नाद्रमुक जैसी पार्टियाँ ईवीएम रखे स्ट्रांग रूम की निगरानी कर रही हैं। कई सुरक्षा बल तैनात हैं, लेकिन पार्टियों ने 4 मई को मतगणना तक ईवीएम सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपनी निगरानी भी लगाई है।