शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : Video - "तुम्ही लग्न कधी करणार आहात?"; काश्मिरी मुलीने राहुल गांधीना विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:29 IST

Rahul Gandhi : दहा मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी काश्मिरी विद्यार्थ्यांशी काश्मीरच्या भविष्यापासून मुलींच्या रोजगाराच्या संधींपर्यंत प्रत्येक विषयावर चर्चा केली.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २१ ऑगस्ट रोजी राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले, जिथे त्यांनी काश्मीरमधील काही तरुण विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना लग्नाशी संबंधित प्रश्न विचारले, त्यावर त्यांनी हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर दिलं. या मजेदार क्षणाचा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दहा मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी काश्मिरी विद्यार्थ्यांशी काश्मीरच्या भविष्यापासून मुलींच्या रोजगाराच्या संधींपर्यंत प्रत्येक विषयावर चर्चा केली. यावेळी एका विद्यार्थिनीने त्यांना लग्नाशी संबंधित प्रश्न विचारला. विद्यार्थिनीने विचारलं, "राहुलजी, तुम्ही लग्न कधी करणार आहात?" या प्रश्नाला राहुल गांधींनी हसत उत्तर दिलं. संवादाचा हा भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला.

एका काश्मिरी विद्यार्थिनीसोबतच्या लग्नाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, सध्या याबाबत कोणतंही प्लॅनिंग नाही. तसं झालं तर ठीक आहे. गेल्या २०-३० वर्षांपासून लग्न करण्याच्या या दबावातून मी आता बाहेर आलो आहे. या संभाषणात एकाने राहुल गांधींना सांगितलं की, तुम्ही जेव्हाही हे कराल तेव्हा तुम्ही आम्हाला लग्नाचे निमंत्रण नक्की द्या.

राहुल गांधींना त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रश्नांना वेगळे सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रत्येक वेळी त्यांची वेगवेगळी उत्तरं असतात. सध्या मी पक्षाच्या कामात पूर्णपणे मग्न आहे असंही याआधी म्हटलं होतं. गेल्या वर्षी जूनमध्येही राहुल गांधींच्या लग्नाच्या प्रश्नाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता. 

राहुल गांधींना लालू प्रसाद यादव यांच्याकडूनही हा प्रश्न विचारण्यात आला होता. पाटणा येथे विरोधी पक्षांच्या सभेत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्न करण्याची विनंतीही केली होती. लालू प्रसाद यादव म्हणाले की, लग्न करा, आम्ही लग्नाच्या वरातीत येऊ. काँग्रेस नेत्याने हसून उत्तर दिलं होतं की,  आता तुम्ही सांगितलं आहे तर ते होईल. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीmarriageलग्न