शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी चिमुरड्याला पाण्यातून पुलाच्या दिशेनं फेकलं; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 09:03 IST

अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो जोरदार व्हायरल झाला आहे. 

ठळक मुद्देमध्य प्रदेशच्या निवारी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक बसू नये हा प्रयत्न करण्याच्या नादात कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार नदीत कोसळून अपघात झाला.अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला असून तो जोरदार व्हायरल झाला आहे. 

भोपाळ - अपघाताच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. मध्य प्रदेशच्या निवारी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक बसू नये हा प्रयत्न करण्याच्या नादात कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कारनदीत कोसळून अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कारमधील पाचही जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला असून तो जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या निवारी जिल्ह्यातील ओरछाजवळ समोरून भरधाव वेगाने  येणाऱ्या ऑटोरिक्षाला कारची धडक बसू नये या प्रयत्नात कारचा अपघात झाला आहे. कारमधून 5 जण प्रवास करत होते. ऑटोरिक्षाची कारला धडक बसली. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार नदीत कोसळली. कारमधील काही प्रवासी बाहेर आले. मात्र त्याचवेळी गाडीमध्ये एक लहान मुलगा देखील होता. चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी कारमधील एका व्यक्तीने पाण्यातून मुलाला नदीवरील पुलावर उभ्या असेलल्या लोकांच्या दिशेने फेकले मात्र मुलगा नदीत पडला. 

पुलावर उभ्या असलेल्या लोकांनी देखील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कार अपघातातील लोकांना मदतीचा हात दिला. लहान मुलगा पाण्यात पडलेला पाहताच पुलावर उपस्थित असलेल्या लोकांपैकी काहींनी नदीत उडी मारली आणि वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर कारमध्ये अडकलेल्या पाचही जणांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नदीतून सुखरुपरित्या सर्वांना बाहेर काढण्यात यश आले आहे. 

अपघातातील सर्व व्यक्तींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओरछाचे नरेंद्र त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशच्या उरईचे रहिवासी आहेत. उपचारासाठी त्यांना ओरछा स्वास्थ्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघातcarकारriverनदी