कुडरू येथे नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30

कुडरू :

Various religious programs during the pilgrimage of Nagnath Maharaj at Kuduru | कुडरू येथे नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

कुडरू येथे नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

डरू :
माढा तालुक्यातील कुडरू येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त 16 ते 20 मार्चदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा महोत्सव कमिटीचे संयोजक अण्णासाहेब ढाणे यांनी दिली़
16 मार्च रोजी नागनाथ महाराज मंदिरात ‘र्शीं’ना महाभिषेक, महाप्रसाद वाटप त्यानंतर सायंकाळी रथयात्रा व सवाद्य मिरवणूक निघणार आह़े यावेळी शोभेचे दारुकाम होणार आह़े 17 रोजी राज्यस्तरीय निकाली कुस्त्या होती़ 18 रोजी जय मल्हारनिर्मित ‘गर्जा महाराष्ट्र’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल़ 19 आणि 20 रोजी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होतील़ तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन नागनाथ यात्रा महोत्सव कमिटीने केले आह़े (वार्ताहर)

Web Title: Various religious programs during the pilgrimage of Nagnath Maharaj at Kuduru