शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

Vande Bharat : दे दणादण! वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी लोको पायलट भिडले, तुफान राडा घालत गार्डवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 08:53 IST

Vande Bharat : वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून लोको पायलट आपापसात भिडले. सुरुवात आधी वादावादीने झाली आणि पुढे काही वेळातच हाणामारी झाली.

उदयपूर ते आग्रा दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून रेल्वे कर्मचाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता २ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही ट्रेन आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कर्मचाऱ्यांमधील या हाणामारीत मालमत्तेचं नुकसान झालं असून एक कर्मचारी जखमी झाला आहे. सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हा वाद कोटा आणि आग्रा रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये झाला होता. वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून लोको पायलट आपापसात भिडले. सुरुवात आधी वादावादीने झाली आणि पुढे काही वेळातच हाणामारी झाली. ट्रेनचे लोके पायलट भिडले आणि गार्डवर हल्ला करण्यात आला. याशिवाय संतप्त कर्मचाऱ्यांनी गार्ड रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून केबिनची काच फोडली.

वंदे भारतच्या केबिनचं मोठं नुकसान 

या घटनेत लोको पायलट जखमी झाला. तसेच हाणामारीत वंदे भारतच्या केबिनचंही मोठं नुकसान झालं. हा वाद वाढल्यानंतर आता ही बाब रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पश्चिम मध्य रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे आणि उत्तर रेल्वे या रेल्वेच्या कामकाजात गुंतलेल्या विविध रेल्वे विभागांमधील संघर्षामुळे सेवेच्या सुरळीत कामकाजावर परिणाम होत असल्याचं दिसतं.

सोशल मीडियावर Video व्हायरल

या अंतर्गत वादांमुळे वंदे भारत ट्रेन या मार्गावर अनेकवेळा उशिराने धावत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आहे. या भांडणातील सहभागी कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम अधिकारी करत असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसSocial Viralसोशल व्हायरल