शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘यूपीएससी’वरून संसदेत गदारोळ

By admin | Updated: August 2, 2014 03:34 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी-सॅट परीक्षेवरून विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सी-सॅट परीक्षेवरून विरोधकांनी संसद दणाणून सोडली. लोकसभेत एका सदस्याने आक्रमक पवित्रा घेत वर्तमानपत्राची फाडाफाड करून ते अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले, तर राज्यसभेत सरकारने हा मुद्दा ठराविक कालमर्यादेत सोडविण्यास नकार दिल्याने समस्त विरोधकांनी सभात्याग करून या मुद्यावर एकीचे दर्शन घडविले.संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी या मुद्यांवरून जोरदार गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज भोजनावकाशाआधी तीन वेळा तहकूब करावे लागले. सत्तारूढ सदस्यांना चिथावणी देत कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून विरोधकांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांना चांगलेच धारेवर धरले. यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार अत्यंत गंभीर असून सरकार सर्व पैलूंवर विचार करीत आहे. या मुद्यांवर (सी-सॅट) नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल एक दिवसापूर्वीच मिळाला असून त्यावर अभ्यास केला जात आहे. लवकरात लवकर हा मुद्दा मार्गी लावण्याची सरकारची इच्छा आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, विरोधकांचे त्यावर समाधान झाले नाही. हा मुद्दा सोडविण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी करीत विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला.दुसरीकडे लोकसभेत राजदचे राजेश रंजन हाताने वर्तमानपत्र उंचावत अध्यक्षांच्या आसनापुढील हौदात उतरले. या मुद्यांवर सरकारने निवेदन करण्याची जोरदार मागणी करीत त्यांनी नंतर हातातील वर्तमानपत्र फाडून ते अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले.हा मुद्यावर आठवडाभरात निवेदन करण्याचे सरकारनेच स्पष्ट केले होते. तथापि, ही मुदतही संपली, याकडे राज्यसभेत विरोधकांनी लक्ष वेधले असता कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की, समितीचा अहवाल आजच मिळाला. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असून त्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या अहवालावर अभ्यास करण्याइतपत तरी मुदत द्या. सरकारने मागितलेली मुदत संपल्याची कबुलीही त्यांनी दिली. गृहमंत्री राजनाथसिंग आणि कार्मिक राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत समाजवादी पार्टी, बसपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)