शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: भर सभेत कार्यकर्त्याच्या पाया पडले नरेंद्र मोदी, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 19:50 IST

यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली असून ते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दरम्यान, आज(रविवार) एका प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांचे एक वेगळे रुप सर्वांना पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींनी भर सभेत एका भाजप कार्यकर्त्याच्या पायाला स्पर्श केला. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी उन्नाव येथे आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी मोदींना भगवान श्रीरामाची मूर्ती भेट दिली. मूर्ती दिल्यानंतर अवधेश कटियार यांनी पीएम मोदींच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर पीएम मोदींनी अवधेश कटियार यांना यासाठी मनाई केली आणि शिष्टाचार म्हणून पंतप्रधानांनी स्वतः अवधेशच्या पायाला स्पर्श केला. 

रामाची मूर्ती भेट म्हणून देणाऱ्याने पायाला स्पर्श करू नये, असे पंतप्रधानांच्या कृत्यामागचे कारण आहे. पंतप्रदानांच्या या कृत्याचे अनेकजण कौतुक करत आहेत. भाजप नेते अरुण यादव यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले
उत्तर प्रदेशमध्ये रविवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. राज्यात 7 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यावेळी भाजप आणि सपामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. पक्षांचे बडे नेते निवडणूक अनेक रॅलींना संबोधित करत असून एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली असून ते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.
 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Narendra Modiनरेंद्र मोदी