शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधीजींच्या नुतनीकरण केलेल्या पुतळ्याचे अनावरण, दुर्मिळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण

By वसंत भोसले | Updated: December 26, 2024 19:40 IST

काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रम

राम मगदूम, लोकमत न्यूज नेटवर्क, बेळगाव: १९२४ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली येथील व टिळकवाडीतील वीरसौध परिसरात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सवानिमित्त तेथील गांधींजींच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे अनावरण आणि दुर्मिळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण उत्साहात पार पडले.

महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते तर छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले.त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी वीरसौध वास्तूतील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बैठ्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी मंत्री एच. के. पाटील, एम. बी. पाटील, एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरण प्रकाश, के. एच. मुनियप्पा, आमदार असिफ तथा राजू सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, माहिती खात्याचे सचिव कामेरी बी. बी., आयुक्त हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माहिती खात्याचे संयुक्त संचालक मंजुनाथ डोळ्ळीन, उपसंचालक गुरुनाथ कडबुर आदी उपस्थित होते.

टॅग्स :belgaonबेळगावcongressकाँग्रेस