शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

आता काय आम्ही स्वत:ला गळफास लावून घेऊ का?; लस टंचाईबद्दल विचारताच मोदींचे मंत्री भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:16 PM

केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा पत्रकारांच्या प्रश्नावर संतापले

बंगळुरू: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य यंत्रणेचं कंबरडं मोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज साडे लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या तरी कोरोना लसींचा तुटवडा असल्यानं अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. याबद्दल केंद्रीय रसायन मंत्री डी. व्ही सदानंद गौडा यांना प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून गौडा चांगलेच भडकले. लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्यून का ऐकवता?, कोर्टानं सरकारला झापलंमोदी सरकारमध्ये असलेल्या गौडा यांना कोरोना लसींच्या उत्पादनाबद्दल आणि तुटवड्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्पादन कमी होतंय म्हणून सरकारमध्ये असलेल्या लोकांनी स्वत:ला गळफास लावून घ्यायचा का, अशा शब्दांत गौडा यांनी संताप व्यक्त केला. 'सर्वांचं लसीकरण व्हायला हवं असं न्यायालयानं चांगल्या हेतूनं म्हटलं. मी तुम्हाला विचारू इच्छितो की उद्या न्यायालयानं म्हटलं, तुम्हाला इतके डोस द्यायचे आहेत आणि तितक्या डोसचं उत्पादन झालं नाही, तर मग आम्ही स्वत:ला गळफास लावून घ्यायचा का?,' असा सवाल गौडा यांनी पत्रकारांना विचारला."लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या"लसींच्या तुटवड्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर गौडा यांनी सरकारच्या योजनांचा उल्लेख केला. 'सरकारचे निर्णय कोणत्याही राजकीय फायद्यासाठी घेतले जात नाहीत. सरकार आपलं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत आहेत. यादरम्यान काही त्रुटी समोर आल्या आहेत. मात्र काही गोष्टी आमच्या नियंत्रणात नाहीत. मात्र तरीही परिस्थिती सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,' असं गौडा म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस