शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन डोकी असलेल्या बाळाचा जन्म, निर्दयी आई-बापाने काढला पळ; संस्थेने स्विकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 10:40 IST

रांचीतील डॉक्टरांनी स्थापन केलेल्या करुणा संस्थेने त्या बाळाची जबाबदारी घेतली आहे.

रांची:झारखंडची राजधानी रांचीमध्ये असलेल्या रिम्स (RIMS)  मध्ये एका नवजात मुलाला सोडून त्याचे पालक पळून गेल्याची घटना घडली आहे. बाळाला सोडून पळून जाण्याचे कारण म्हणजे, त्या नवजात बालकाला दोन डोकी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाला जन्मतःच ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल या आजाराने ग्रासले आहे. यात डोक्याचा मागचा भाग थैलीसारखा होऊन दोन डोक्यांसारखा दिसतो. 

आई-बापाने काढला पळ

दोन डोकी असलेल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या निर्दयी पालकांनी त्या बाळाला रुग्णालयात सोडून पळ काडला. पळून गेल्यानंतर मुलाच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांनी हॉस्पिटलमध्ये नोंदवलेला पत्ताही बनावट असल्याचे आढळून आले. कदाचित त्यांना आधीच कल्पना होती की, त्यांचे मूल सामान्य होणार नाही किंवा त्यांनी आधीच ठरवले होते की मुलाला जन्म दिल्यानंतर पळून जावे लागेल. जन्मानंतर बाळाला आयसीयूमध्ये दाखल करुन कुटुंबीय शांतपणे निघून गेले. पण, आता रिम्सच्या डॉक्टरांनी त्या बाळाला वाचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

करुणा संस्थेने घेतली बाळाची जबाबदारीRIMS व्यवस्थापनाने CWC ला मूल एकटे असल्याची माहिती दिली. CWC कडून माहिती मिळाल्यानंतर करुणा संस्थेचे लोक त्या मुलाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. संस्थेतील लोकांच्या म्हणण्यानुसार, बाळाला निओनेटलमधून न्यूरो सर्जरी विभागात पाठवण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस थांबल्यानंतर डॉक्टरांनी बाळावर शस्त्रक्रिया केली. उपचारानंतर बाळाला करुणा आश्रमात नेण्यात येणार आहे. रांचीचे अनेक ज्येष्ठ डॉक्टर मिळून ही संस्था चालवतात.

मेंदूचा योग्य विकास न झाल्यास अशी समस्या उद्भवते

आरआयएमएसच्या न्यूरो सर्जरी विभागाचे डॉ. सीबी सहायने सांगितले की, मुलाला जन्मजात आजार आहे. या आजारात मेंदूचा डोक्याच्या मागचा भाग, CSF बाहेर येऊन थैलीसारखा बनतो. हा हुबेहुब डोक्यासारखे दिसते. वैद्यकीय भाषेत त्याला ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल म्हणतात. डॉक्टरांच्या टीमने मिळून दोन तास शस्त्रक्रिया केल्यानंतर हा भाग काढून टाकण्यात आला आहे. सध्या बाळाची प्रकृती ठीक असून, तो डॉक्टरांच्या निगरानीत आहे. 

टॅग्स :Jharkhandझारखंडranchi-pcरांचीhospitalहॉस्पिटल