शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’साठी केंद्र सरकारचे दोन लकी ड्रॉ

By admin | Updated: December 26, 2016 00:59 IST

कॅशलेस अर्थव्यवस्था आणि डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन लकी ड्रॉ योजनांची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : कॅशलेस अर्थव्यवस्था आणि डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन लकी ड्रॉ योजनांची घोषणा केली आहे. ख्रिसमसचे औचित्य साधून त्यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डीजी धन व्यापार योजना जाहीर केली, तर तीन महिन्यांनंतर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बंपर ड्रॉ असेल. या दिवशी कोट्यवधी रुपयांची बक्षिसे दिली जातील. आकाशवाणीवरील या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, ग्राहकांच्या प्रोत्साहनासाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डीजी धन व्यापार योजना आहे. पूर्ण देशात गाव असो की, शहर अथवा शिकलेले लोक असोत की, अशिक्षित या सर्वांमध्ये एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे कॅशलेस काय आहे? हा व्यवहार कसा चालतो? नगदीशिवाय खरेदी कशी केली जाऊ शकते. सगळीकडे एक उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकजण एकमेकांकडून काही शिकू इच्छित आहे. मोबाईल बँकिंगला बळ मिळण्यासाठी या प्रोत्साहन योजनेचा आज प्रारंभ होत आहे. मोदी म्हणाले की, २५ डिसेंबर रोजी आज ख्रिसमसच्या निमित्ताने १५ हजार नागरिकांना लकी ड्रॉचे प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आगामी शंभर दिवस ही योजना चालणार आहे. दररोज १५ हजार नागरिकांना बक्षिसे मिळतील.तीन हजारांपर्यंत खरेदी करणाऱ्यांसाठी योजनाही योजना समाजातील सर्व घटकांसाठी आहे. विशेषत: गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्ग यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे.  ५० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत खरेदी करणारांसाठी ही योजना आहे. गरिबातील गरीब लोक यूएसडीचा वापर करून साध्या मोबाईलच्या माध्यमातूनही व्यवहार करू शकतात.  भारतात आज ३० कोटी रुपे कार्ड आहेत. यात २० कोटी गरीब कुटुंब जन-धन खाते असणारे आहेत. हे ३० कोटी लोक या योजनांचा भाग बनू शकतात. मोदी म्हणाले की, मला विश्वास आहे की, देशातील नागरिक या व्यवहारात रस दाखवतील. आपल्या आजूबाजूला असणारी तरुण मुले याबाबत माहितीही देऊ शकतील.