शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिकाऱ्यांचा सुट्ट्यांना जोडून दोन दिवसांचा संप; विलीनीकरणास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 06:42 IST

२६ ते २९ सप्टेंबरपर्यंत व्यवहार राहणार बंद

नवी दिल्ली : देशातील सरकारी १0 बँकांच्या विलीनीकरणातून चार मोठ्या बँका करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरातील बँकांचे अधिकाऱ्यांनी २६ व २७ सप्टेंबर रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर, २८ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार व २९ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने त्याही दिवशी बँका बंद राहतील. त्यामुळे देशातील सरकारी बँकांचे व्यवहार तब्बल चार दिवस ठप्प होणार आहेत.

याशिवाय या बँक अधिकाºयांनी नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापासून बेमुदत संपावर जाण्याचाही इशारा दिला आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कान्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस व नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या चार संघटनांनी मिळून संपाचे आवाहन केले आहे.

या चार संघटनांनी इंडियन बँक असोसिएशनला गुरुवारी पाठविलेल्या पत्रात या संपाचा उल्लेख केला आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, १0 सरकारी बँकांचे विलीनीकरण व त्यातून चार बँका करण्याच्या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे अनेक बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या नोकºया जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय त्यांनी बँकांचे कामकाज आठवड्यातून पाच दिवस चालावे, आर्थिक व्यवहाराचे तास कमी करण्यात यावे, बँकांच्या कामकाजात अन्य एजन्सीकडून होणारा हस्तक्षेप थांबावा, निवृत्तांचे पेन्शन व फॅमिली पेन्शन यांवर सीलिंग नसावे, त्यांनाही मेडिकल इन्शुरन्सचा फायदा मिळावा आदी मागण्याही या संघटनांनी केल्या आहेत. खातेदारांकडून आकारणारे सेवा शुल्क कमी करावे आवश्यक त्या प्रमाणात नव्याने नोकरभरती करण्यात यावी आणि अकार्यक्षम असल्याचे कारण पुढे करून होणारा अधिकाºयांचा छळ थांबविण्यात यावा, याही अधिकाºयांच्या संघटनेच्या मागण्या आहेत.खासगी बँका सुरूच राहणारहा संप सरकारी बँकांमधील अधिकाºयांचाच आहे. त्यात देशातील खासगी बँका सहभागी होणार नाहीत. त्यामुळे २६ व २७ सप्टेंबर रोजी सर्व खासगी बँका नेहमीप्रमाणे कामकाज करणार आहेत. खासगी बँकांच्या खातेदारांना संपाचा थेट परिणाम जाणवण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :bankबँक