शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तिरुपती मंदिर परिसरात झाली चेंगराचेंगरी! ६ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 09:48 IST

या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे.

'तिरुपती विष्णू निवासम' या निवासी परिसरात बुधवारी (९ जानेवारी) रात्री  झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन मिळविण्यासाठी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कशी झाली चेंगराचेंगरी? -पवित्र वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविकांनी येथे दर्शन घेण्यासाठी टोकन मिळावे म्हणून गर्दी केली होती. गुरुवारी सकाळी ५ वाजल्यापासून ९ काउंटर्सवर टोकन वाटप करण्यात येणार होते. तिरुपती शहरात आठ ठिकाणी टोकन वितरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. येथे शुभ मुहुर्तू साधण्यासाठी भाविकांनी आधीपासूनच गर्दी करायला सुरूवात केली. परिणामी बुधरावी सायंकाळच्या सुमारास एका शाळेवरील केंद्रावर गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरी झाली. ज्यात सहा जनांना आपला जीव गमवावा लागला.

जखमी रुग्णालयात दाखल -या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे.

अधिक बातम्यांसाठी... - 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी व्यक्त केला शोक -या घटनेनंतर, मंदिर समितीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली. तसेच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी भाविकांचा मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन योग्या त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 

वैकुंठ एकादशीचा कार्यक्रम - मिळालेल्या माहितीनुसार, १०-१९ जानेवारीदरम्यान वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी तिरुपती मंदिरात येतील. यासाठी तिरुपती मंदिर ट्रस्टने संपूर्ण तयारीही केली आहे. टीटीडीने गुरुवारपासून तिरुपतीमधील ९ केंद्रांमध्ये ९४ काउंटर्सवर वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन देण्याची व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलAndhra Pradeshआंध्र प्रदेश