शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:26 IST

मानक कार्यप्रणालीनुसार विमान परत दिल्ली विमानतळावर आणण्यात आले असं एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले.

नवी  दिल्ली - दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला सोमवारी टेकऑफनंतर तातडीने आपत्कालीन स्थितीत दिल्लीला परतावे लागले. उड्डाणानंतर या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड समोर आला. त्यानंतर विमान पायलटने सुरक्षेला प्राधान्य देत एअर टर्नबॅक घेण्याचा निर्णय घेतला. विमानाच्या सुरक्षित लँडिंगनंतर सर्व प्रवासी आणि क्र मेंबरला सुरक्षित विमानतळावर उतरवण्यात आले. ही घटना एअर इंडियाच्या AI 887 विमानात घडली. हे विमान दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले होते. हे उड्डाण बोईंग ७७७-३००ईआर (VT-ALS) विमानाने केले जात होते. 

टेकऑफनंतर काय घडलं?

सूत्रांनुसार, टेकऑफनंतर काही मिनिटांनी या विमानाचे फ्लॅप मागे घेतले जात होते त्याचवेळी विमानातील क्रू मेंबर्सला उजव्या इंजिनमध्ये तेलाचा दाब कमी असल्याची सूचना मिळाली. काही क्षणांनी इंजिनचे ऑयल प्रेशर पूर्णपणे शून्य झाले होते. ज्यातून तांत्रिक बिघाड निर्माण झाला. सुरक्षेच्या दृष्टीने पायलटने तातडीने एअर टर्नबॅक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान सावधानीपूर्वक दिल्ली विमानतळाच्या दिशेने वळले आणि मानक प्रक्रियेचे पालन करत सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

एअर इंडियाचं अधिकृत निवेदन केले जारी

मानक कार्यप्रणालीनुसार विमान परत दिल्ली विमानतळावर आणण्यात आले असं एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले. ही लँडिंग पूर्णपणे सुरक्षित होती आणि कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही असं विमान कंपनीने स्पष्ट केले. 

तांत्रिक तपासणी सुरू, विमान सध्या ग्राउंड केले

दरम्यान, या विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू आहे असं एअर इंडियाने सांगितले. इंजिन ऑइलच्या वापराबद्दल कोणत्याही असामान्यतेची नोंद मागील रेकॉर्डमध्ये नव्हती असं सुरुवातीच्या तपासात दिसून आले. विमान सध्या ग्राउंड केलेले आहे आणि सर्व आवश्यक तपास पूर्ण झाल्यानंतरच ते पुन्हा सेवा सुरू करेल असं कंपनीने सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Air India flight returns to Delhi after engine malfunction mid-air.

Web Summary : An Air India flight from Delhi to Mumbai made an emergency landing due to an engine oil pressure issue shortly after takeoff. The plane safely returned to Delhi airport. All passengers and crew disembarked safely, and a thorough technical inspection is underway.
टॅग्स :Air Indiaएअर इंडिया