किश्तवाडमध्ये जैशच्या कमांडरसह तिघांचा खात्मा; गोळी लागूनही सेनेच्या टायसनने दाखवले ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 05:53 IST2026-02-23T05:51:26+5:302026-02-23T05:53:34+5:30

'जैश-ए-मोहम्मद'चे दहशतवादी मातीच्या घरात लपले होते. याचा सुगावा लागताच सुरक्षा दलाने गोळीबार केला. यात घराला आग लागली.

Three including Jaish commander killed in Kishtwar; Army's Tyson shows location despite being shot | किश्तवाडमध्ये जैशच्या कमांडरसह तिघांचा खात्मा; गोळी लागूनही सेनेच्या टायसनने दाखवले ठिकाण

किश्तवाडमध्ये जैशच्या कमांडरसह तिघांचा खात्मा; गोळी लागूनही सेनेच्या टायसनने दाखवले ठिकाण

-सुरेश एस. डुग्गर, जम्मू 
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात रविवारी लष्कराच्या 'व्हाइट नाइट कॉर्न्स'च्या जवानांनी 'जैश-ए-मोहम्मद'च्या ३ दहशतवाद्यांना ठार केले. यात 'जैश'चा कमांडर सैफुल्लाह याचा समावेश आहे. 

'जैश-ए-मोहम्मद'चे दहशतवादी मातीच्या घरात लपले होते. याचा सुगावा लागताच सुरक्षा दलाने गोळीबार केला. यात घराला आग लागली. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह जळालेले होते. या कारवाईत दोन एके-४७ रायफल आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या भागात १८ जानेवारीपासून सहा चकमकी झाल्या आहेत.

गोळी झेलणारा 'टायसन' ठरला हिरो

चकमकीत खरा हिरो ठरला 'सायलेंट वॉरियर' म्हणून ओळखला जाणारा 'टायसन' नावाचा श्वान. त्याच्यामुळेच सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे ठिकाण, त्यांच्या हालचाली व अचूक कारवाईची दिशा ठरवण्यास मदत झाली. 'टायसन' दहशतवाद्यांच्या दिशेने आगेकूच करत असताना त्याच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या.

यातील एक गोळी टायसनच्या पायाला लागली. जखमी अवस्थेतही टायसन मागे हटला नाही. तो पुढे जात राहिला. त्याच्या धाडसामुळे दहशतवादी सापडले आणि सुरक्षा दलांनी निर्णायक कारवाई केली. टायसनला विशेष वैद्यकीय उपचारांसाठी एअरलिफ्ट करण्यात आले. त्याची प्रकृती सुधारत आहे.

Web Title : किश्तवाड़ में जैश कमांडर सहित तीन आतंकवादी ढेर; कुत्ते ने की मदद।

Web Summary : किश्तवाड़ में सुरक्षा बलों ने जैश-ए-मोहम्मद के कमांडर सैफुल्लाह समेत तीन आतंकवादियों को मार गिराया। टायसन नामक एक कुत्ते ने गोली लगने के बावजूद बहादुरी से आतंकवादियों का पता लगाने में मदद की, जिससे सफल अभियान संभव हो सका। टायसन का इलाज चल रहा है।

Web Title : Three militants, including Jaish commander, killed in Kishtwar; Dog helps.

Web Summary : Security forces killed three Jaish-e-Mohammed militants, including commander Saifullah, in Kishtwar. A dog named Tyson, despite being shot, bravely helped locate the militants, enabling the successful operation. Tyson is receiving medical treatment.