शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 22:10 IST

वैशाली जिल्ह्यातही लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाच्या राजदच्या एका नेत्याचा वाढदिवस साजरा करताना तलावात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

माजी केंद्रीय मंत्री, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा आज वाढदिवस आहे. बिहारची निवडणूक असल्याने तो नजरेत भरण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात साजरा करत आहेत. असाच एका नेत्याने लालूंचा वाढदिवस चिखलाच्या तळ्यात करण्याचा प्रयत्न केला आणि गंमत अशी झाली की होडीतून तोल गेल्याने केक घेऊनच त्या चिखलात कोसळला. 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लालूप्रसाद यांचा आज ७८ वा वाढदिवस होता. लालू यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रांग लागली होती. लालू यांनी सर्वांचे स्वागत केले आणि त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या. परंतू, जे तिकडे जाऊ शकले नाहीत त्यांनी त्यांच्या गावात, शहरात हा वाढदिवस साजरा केला. 

वैशाली जिल्ह्यातही लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाच्या राजदच्या एका नेत्याचा वाढदिवस साजरा करताना तलावात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. केदार यादव भगवानपूर ब्लॉकमधील किरतपूर राजाराम गावात लवाजम्यासह गेले होते. तलावाच्या पाण्यात एक होडी सोडण्यात आली. पाणी म्हणजे तसा चिखलच होता. काही कार्यकर्ते आणि यादव असे चार-पाच जण होडीवर चढले. खुर्चीवर केक ठेवण्यात आला. जसा यादव यांनी केक कापायला हात पुढे केला तसा होडीचा तोल गेला आणि एका बाजुला झुकली. 

केदार यादव केक हातात घेऊन पाण्यात पडले आणि आपल्याच फजितीवर हसू लागले. एव्हाना ते चिखलाने माखलेले होते. मग किनाऱ्यावरील कार्यकर्त्यांनी आणखी काही केक आणले होते, त्यातीलच एक केक घेत तो होडीवरच कापत लालूंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

हे तेच मजेशीर केदार यादव आहेत, ज्यांनी कधी जेसीबी मशीनवर चढून तर कधी म्हशीवर बसून केक कापला होता. एकदा तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले होते, तर या महाशयांनी राष्ट्रीय महामार्ग-२२ च्या बाजूला असलेल्या रस्त्याची पूजा केली होती. 

टॅग्स :Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव