बिबट्याला रोखण्यासाठी तरुणाचं धाडस, जमिनीवर आपटलं आणि पाठीवर बसला, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:04 IST2026-04-22T14:03:18+5:302026-04-22T14:04:41+5:30

Madhya Pradesh News: गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक राज्यांमध्ये बिबट्यांकडून मानवी वस्तीवर होत असलेले हल्ले हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. यारदम्यान, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील धामनोद वनक्षेत्रात असलेल्या गुजरी डेहरिया गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत.

The young man's courage to stop the leopard, hit the ground and sat on his back, then... | बिबट्याला रोखण्यासाठी तरुणाचं धाडस, जमिनीवर आपटलं आणि पाठीवर बसला, त्यानंतर...

बिबट्याला रोखण्यासाठी तरुणाचं धाडस, जमिनीवर आपटलं आणि पाठीवर बसला, त्यानंतर...

गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक राज्यांमध्ये बिबट्यांकडून मानवी वस्तीवर होत असलेले हल्ले हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. यारदम्यान, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील धामनोद वनक्षेत्रात असलेल्या गुजरी डेहरिया गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. यावेळी एका तरुणाने बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न करताना त्याच्याशी दिलेल्या झुंजीची आता चर्चा होत आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात या बिबट्याने हल्ला करून अनेक जणांना रक्तबंबाळ केल्याचं दिसत आहे. तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता या बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. यादरम्यान, एक तरुण बिबट्याला जमिनीवर आपटून त्याच्यावर बसताना दिसत आहे. मात्र बिबट्याला रोखणं त्यालाही शक्य होत नाही, तसेच तो त्याच्या पकडीतून निसटून पळून जातो.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्या आल्याची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आता बिबट्याच्या हल्ल्या जखमी झालेल्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्र गुरजी येथे उपचार केले जात आहेत.  

Web Title : युवक का साहस: मध्य प्रदेश गांव में तेंदुए को ज़मीन पर गिराया

Web Summary : मध्य प्रदेश में एक तेंदुए ने गांव पर हमला कर चार लोगों को घायल कर दिया। एक बहादुर युवक ने तेंदुए को ज़मीन पर गिराकर काबू करने की कोशिश की। तेंदुआ भाग गया, जिससे डर फैल गया। वन अधिकारी स्थिति को नियंत्रित करने और घायलों का इलाज करने में जुटे हैं।

Web Title : Youth's Courage: Tackles Leopard to Ground in Madhya Pradesh Village

Web Summary : In Madhya Pradesh, a leopard attacked a village, injuring four. A brave youth tackled the leopard to the ground, trying to subdue it. The leopard escaped, causing fear. Forest officials are now working to control the situation and treat the injured.