शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:38 IST

एक कपल चक्क महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरण्याचं  काम करत होते. त्यांच्या चोरीचा फंडा इतका हटके होता की, चोरी होतेय हेच कुणाच्या लक्षात आले नाही.

आजवर चोरीची अनेक प्रकरणं तुम्ही ऐकली असतील. महागड्या वस्तू, मोबाईल, पैसे अशा गोष्टी चोरीला गेल्याचे अनेकदा कानावर पडले असेल. पण आता कानपूरमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या भागात राहणारे एक कपल चक्क महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरण्याचं  काम करत होते. त्यांच्या चोरीचा फंडा इतका हटके होता की, चोरी होतेय हेच कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र, जेव्हा वाईन शॉपच्या स्टॉकमध्ये सतत काहीतरी कमी असल्याचे लक्षात आल्यावर, दुकानदाराला संशय आला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. 

सातत्याने दुकानातील महागड्या दारूच्या बाटल्या गायब होत असल्याचं लक्षात आल्यावर दुकानदाराने कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सांगितले. मागील एक महिन्यापासून दुकानातील महागड्या वाईनच्या बाटल्या अचानक गायब होत होत्या. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गेल्या एक महिन्यापासून एक जोडपं त्यांच्या दुकानात सतत येत आहे. हे जोडपं एक बॉटल खरेदी करतं आणि पुन्हा बाटल्यांच्या रॅक जवळ जाऊन घुटमळतं. ते तिथून बाजूला होताच एखादी बॉटल गायब झालेली दिसत होती. 

चोरी केलीच पण 'असे' पकडले गेले!

सदर प्रकार दुकानदाराच्या लक्षात आल्यावर त्यानं पुढच्या वेळेस हे जोडपं दुकानात आलं की त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा, असे कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पुन्हा जेव्हा हे जोडपं दारूची बॉटल खरेदी करण्यासाठी या दुकानात आलं, तेव्हा त्यांच्यावर सीसीटीव्हीमधून लक्ष ठेवण्यात आलं होतं. नेहमीप्रमाणेच त्यांनी एक बॉटल विकत घेतली आणि नंतर रॅकजवळ घुटमळत राहिले. या दरम्यान जोडप्यातील तरुणीने रॅकमधील एक बॉटल उचलून आपल्या कपड्यांमध्ये लपवली, दुकानातील कर्मचाऱ्यांनी हे पाहिलं आणि बाहेर पडत असताना तरुणीला रोखलं. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने आपल्या जवळची बॉटल तरुणाच्या हातात दिली आणि ती तिथून पसार झाली.

तरुणी झाली पसार

मात्र, दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला पकडल्यामुळे सदर चोरीचा प्रकार समोर आला. तरुणाची चौकशी करताच त्याने सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून ते दोघेही दुकानातील महागड्या दारूच्या बाटल्या चोरत होते. या तरुणाचे नाव नबील असे असून, पळून गेलेली तरुणी त्याची गर्लफ्रेंड होती. तिचे नाव श्रेया आहे. सध्या श्रेया गायब असून पोलीस तिचा शोध घेत आहेत, तर नबील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Couple Pilfered Liquor from Store; Caught Stealing Bottles!

Web Summary : A Kanpur couple stole expensive liquor by concealing bottles. The store owner noticed the missing stock and reviewed CCTV footage, revealing their repeated thefts. One was caught; the other fled.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरKanpur Policeकानपूर पोलीस