शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:06 IST

Cyber Crime News: पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्यामुळे एकीकडे देशात दु:ख आणि संतापाची भावना आहे. तर दुसरीकडे अशा प्रसंगातही काही लोक फसवणुकीसारखी कृत्ये करत आहेत. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून अशीच एक घटना समोर आली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्यामुळे एकीकडे देशात दु:ख आणि संतापाची भावना आहे. तर दुसरीकडे अशा प्रसंगातही काही लोक फसवणुकीसारखी कृत्ये करत आहेत. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे काही सायबर गुन्हेगारांनी एका पुजाऱ्याला लक्ष्य करत हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. कानपूरमधील पनकी येथे राहणाऱ्या एका पुजाऱ्याला एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण भारतीय लष्करात अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच लष्कराची एक तुकडी काश्मीरमध्ये जात असल्याने त्यासाठी एक पूजा करायची असल्याचे सांगितले. तसेच या पूजेची दक्षिणा देण्यासाठी तुमच्या बॅक खात्याची सविस्तर माहिती पाठवा, असेही सांगितले आणि पुजाऱ्याकडून त्याचा बँक अकाऊंट नंबर घेतला. तसेच या पुजाऱ्याच्या खात्यामधील पैशांवरच डल्ला मारला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कानपूरमधील पनकी येथे राहणारे पुजारी कृष्ण बिहारी शुक्ला हे पूजा आणि रुद्राभिषेक करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन आला होता. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण कानपूर कँटमधून लष्कराचा अधिकारी बोलत आहे असे सांगितले. फोन करणाऱ्याने पुजाऱ्याला सांगितले की, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कानपूर कँट येथून लष्कराची एक तुकडी काश्मिरला जात आहे. त्यांच्यासाठी रुद्राभिषेक करायचा आहे.

त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून पुजाऱ्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याशीही बोलणं करून दिलं. तसेच पैसे देण्यासाठी बँकेचा खाते क्रमांक घेतला. मात्र नंतर सदर पुजाऱ्याच्या खात्यातून सगळी रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे पुजाऱ्याला समजले. त्यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.     

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला