शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 21:58 IST

Aravalli Range News: पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अरवली पर्वताच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने आज अखेर महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. सरकारने अरवली पर्वतरांगांमध्ये नव्या खाणकामासाठी परवाने देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.  

पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अरवली पर्वताच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने आज अखेर महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. सरकारने अरवली पर्वतरांगांमध्ये नव्या खाणकामासाठी परवाने देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.  आता अरवली पर्वतरांगांच्या कुठल्याही भागात खाणकामासाठी नवी परवानगी मिळणार नाही, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारांना स्पष्टपणे सांगितले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर खाणकाम आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या माफियांच्या मुळावर घालण्यात आलेला मोठा घाव आहे, असे मानले जात आहे. 

पर्यावरण आणि सातत्याने घटत चाललेल्या पाण्याच्या पातळीबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे केंद्र सरकारने हा आदेश देताना स्पष्टपणे सांगितले आहे. अरवली पर्वताला एक निरंतर भौगौलिक पर्वतरांग म्हणून वाचवणे हा आज घेण्यात आलेल्या निर्णयामागचा मोठा उद्देश आहे. या पर्वतरांगेची बेकायदेशीर आणि अमर्याद खाणकामामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यामुळे दिल्ली एनसीआरपासून गुजरातपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग तुटू नये, या हेतूने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आज लागू करण्यात आलेले निर्बंध संपूर्ण अरवली पर्वतरांगेच्या क्षेत्रात समान पद्धतीने लागू होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पर्वतांमध्ये खोदकाम करून नव्या खाणी तयार करण्याची परवानगी मिळणार नाही. सरकारने सध्या सुरू असलेल्या खाणींना त्वरित बंद करण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र तिथे राज्य सरकारांकडून पर्यावरण विषयक नियमांचं कठोरपणे पालन करून घेतलं जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

आता या मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. काँग्रेसने सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सरकार अरवलीची परिभाषा बदलून लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे. एकीकडे सरकार खाणकामावर बंदी घालत आहे. मात्र दुसरीकडे सरकारचं धोरण स्पष्ट नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Government bans new mining in Aravalli range after protests.

Web Summary : The government has banned new mining licenses in the Aravalli range to protect the ecologically sensitive area. This decision aims to curb illegal mining and preserve the Aravalli hills from further damage, addressing environmental concerns and water level depletion. Existing mines will face stricter environmental regulations.
टॅग्स :environmentपर्यावरणCentral Governmentकेंद्र सरकार