शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

'पीएम मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करु शकतात'; मुंबई पोलिसांना मिळाली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी धमकी मुंबई पोलिसांकडे मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानाला दहशतवादी धमकी मिळाली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी दिली. फोन करुन पोलिसांना ही माहिती दिली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेला व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा एक मेल करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून अटक केली. तो व्यक्ती मानसिकृष्ट्या आजारी आहे.  

पंतप्रधान मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केलेले; मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता,यामध्ये पंतप्रधान मोदी अधिकृत परदेश दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात असा इशारा देण्यात आला होता. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना त्याबद्दल माहिती दिली आणि तपास सुरू केला.

याआधीही असे धमकीचे मेल आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर एक धमकी पाठवण्यात आली होती, यामध्ये दोन कथित आयएसआय एजंट्सचा समावेश असलेल्या बॉम्बस्फोटाच्या कटाचा दावा करण्यात आला होता. याशिवाय, गेल्या वर्षी, कांदिवलीतील ३४ वर्षीय रहिवासी शीतल चव्हाण याला पंतप्रधान यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

फ्रान्स- अमेरिका दौऱ्यावर पीएम नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी पॅरिसला गेले आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी जगभराती टेक कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी एआय अॅक्शन समिटमध्ये सहभाग घेतला. बुधवारी पीएम मोदी अमेरिकेत पोहोचले, त्यांचा अमेरिका दौरा १२ आणि १४ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा असणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाPoliceपोलिसMumbaiमुंबई