शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

Video : वर्गात मिशीवर ताव देत होता विद्यार्थी, शिक्षकाने मिशीच कापली ; बजरंग दल नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 10:36 AM

हा विद्यार्थी वर्गामध्ये वारंवार मिशांवर ताव देत होता. असं न करण्याचा इशारा शिक्षकांनी या विद्यार्थ्याला दिला होता. पण शिक्षकांनी सांगितल्यानंतरही तो मिशांवर ताव देतच होता

उत्तर प्रदेशच्या खुर्जा क्षेत्रात एक वेगळीच घटना समोर आली आहे. वर्गात मिशीवर ताव मारणा-या एका विद्यार्थ्याची शिक्षकाने मिशा कापल्याची ही घटना आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून या घटनेला सांप्रदायिक रंग दिला जात आहे. विद्यार्थ्याच्या मिशा कापल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाने शिक्षकाविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनुसार, ज्या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडली तो खुर्जा येथील  शिवम टेक्नीकल कॉलेजमध्ये बी. फार्माचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. हा विद्यार्थी वर्गामध्ये वारंवार मिशांवर ताव देत होता. असं न करण्याचा इशारा शिक्षकांनी या विद्यार्थ्याला दिला होता. पण शिक्षकांनी सांगितल्यानंतरही तो मिशांवर ताव देतच होता,  त्यामुळे संबंधित शिक्षक नाराज झाले आणि त्यांनी विद्यार्थ्याची थेट मिशी कापून टाकली अशी माहिती एका सहकारी विद्यार्थ्याने दिली. jansatta.com ने याबाबत वृत्त दिलं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी दोघंही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे या घटनेला सांप्रदायिक रंग मिळाला आहे. बजरंग दलाने याबाबत नाराजी जाहीर केली असून पोलीस स्थानकात तक्रार देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी करून कारवाई कऱण्याचं आश्वासन दिलं आहे. तर दुसरीकडे संबंधित शिक्षकाला पदच्युत करण्यात आल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ -

    

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशStudentविद्यार्थीTeacherशिक्षक