...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! शोकसभेहून परतताना काळाचा घाला; अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:27 IST2026-02-18T15:26:20+5:302026-02-18T15:27:06+5:30
तामिळनाडूतील तंजावुरजवळ एका शोकसभेहून घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू झाला.

फोटो - ABP News
तामिळनाडूतील तंजावुरजवळ एका शोकसभेहून घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा भीषण अपघातातमृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वल्लम वल्लालर स्ट्रीट येथील रहिवासी ६७ वर्षीय पी. महालिंगम हे शेतकरी होते. त्यांच्या पत्नी महालक्ष्मी (६२ वर्षे) यांच्यासह ते काल सकाळी स्कूटरवरून सेल्लनपेट्टई येथे एका नातेवाईकाच्या शोकसभेसाठी गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना हा अपघात झाला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
वल्लम जंक्शनवर वळण घेत असताना केरळहून तंजावुरच्या दिशेने येणाऱ्या एका कारने महालिंगम यांच्या स्कूटरला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की महालक्ष्मी हवेत फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर महालिंगम गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वल्लम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी महालिंगम यांना रुग्णवाहिकेतून तंजावुर मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात येत होते, मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वल्लम पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कार चालक एस. अर्जुन याला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे.
तंजावुरमध्येच दुसरी एक अपघाताची घटना घडली. मेरी कॉर्नर बस स्थानकावर एका सरकारी बसवरील नियंत्रण सुटल्याने तीन प्रवासी जखमी झाले. बस शेल्टरमध्ये उभे असलेले दुराईराज (५४ वर्षे), त्यांचा मुलगा अभिषेक (१७ वर्षे) आणि सोनाली (२३ वर्षे) हे या अपघातात जखमी झाले आहेत. या धडकेत दुराईराज यांची बाईक बसखाली अडकली आणि बस स्टॉपच्या शेल्टरचंही नुकसान झालं. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे तंजावुर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आं आहे. पोलीस या दोन्ही अपघातांचा अधिक तपास करत आहेत.