शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

५ वेळच्या आमदाराला पराभूत केलं; तमिळनाडूत 'ऑटो ड्रायव्हर' विजय धामू यांचा ऐतिहासिक विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:09 IST

TVK Vijay Dhamu: तमिळनाडू थलपती विजयच्या पक्षाने अनेक दिग्गजांना धक्का देत पराभूत केलं आहे.

Tamil Nadu Election Result 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांना धक्का दिला आहे. सुपरस्टार जोसेफ विजय म्हणजेच लाडका थलापती विजय याच्या तमिझागा वेत्री कझगम या पक्षाने धमाकेदार एन्ट्री करत मोठं यश मिळवलं आहे. अशातच थलापती विजय याच्या पक्षाच्या एका सामान्य ऑटो ड्रायव्हरच्या विजयाची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे.

कोण आहेत विजय धामू?

उत्तर चेन्नईतील रोयापुरम या अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघातून के. विजय धामू यांनी विजय मिळवला आहे. विजय धामू हे कोणी मोठे राजकारणी नसून, रोज रस्त्यावर रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अनेक वर्षांपासून ते थलापती विजय यांचे कट्टर चाहते असून परिसरात त्यांचा फॅन क्लब चालवतात.

दिग्गजांना चारली धूळ

विजय धामू यांच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणातील बड्या नेत्यांना पराभूत केले आहे. रोयापुरममधून सलग पाच वेळा आमदार राहिलेले आणि माजी मंत्री असणाऱ्या जयकुमार यांना विजय धामू यांनी चक्क तिसऱ्या क्रमांकावर ढकलले. तर माजी मंत्री रहमान खान यांचे सुपुत्र सुबैर खान यांनाही धामू यांनी पराभवाचा धक्का दिला.

१४,००० मतांच्या फरकाने पराभव

विजय धामू यांना ५५,००० हून अधिक मते मिळाली आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सुमारे १४,००० मतांच्या फरकाने पराभव केला.

स्थानिक मुद्द्यांवर प्रचार

निवडणूक प्रचारादरम्यान जेव्हा टीव्हीके पक्षाने धामू यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हा स्वतः विजय यांनी त्यांना मिठी मारली होती. या भावूक फोटोने सोशल मीडियावर मोठी चर्चा घडवून आणली आणि धामू यांना त्याचा मोठा फायदा झाला. प्रचारादरम्यान धामू यांनी मोठ्या घोषणा करण्याऐवजी स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. तुम्ही आम्हाला नवीन चेहरे म्हणू शकता, पण आम्ही अनेक वर्षांपासून लोकांच्या सुख-दुःखात जमिनीवर काम करत आहोत, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. त्यांच्या याच कामाची आणि जनसंपर्काची पावती मतदारांनी त्यांना दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Auto driver defeats five-time MLA in Tamil Nadu election.

Web Summary : In Tamil Nadu, auto driver Vijay Dhamu, a fan club leader, achieved a historic victory. Representing Thalapathy Vijay's party, he defeated a five-time MLA and former minister by 14,000 votes, focusing on local issues.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६TamilnaduतामिळनाडूThalapathy Vijayथलापती विजय