शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

इतरांकडून पैसे घ्या, पण मते ‘आप’ला द्या!

By admin | Updated: January 19, 2015 05:47 IST

भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या; पण आपली अमूल्य मते मात्र आम आदमी पार्टीलाच(आप) द्या

नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या; पण आपली अमूल्य मते मात्र आम आदमी पार्टीलाच(आप) द्या, असे आवाहन पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना करून नवा वाद ओढवून घेतला आहे़ काँग्रेसने त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, केजरीवालांनी यासाठी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे़ पश्चिम दिल्लीच्या नवादा भागात रविवारी एका रॅलीला संबोधित करताना, केजरीवाल यांनी उपरोक्त आवाहन केले़ हा निवडणुकांचा काळ आहे़ भाजपा आणि काँगे्रसचे लोक पैसे देत असतील, तर खुश्शाल घ्या; पण मते मात्र आमच्याच पक्षाला द्या़ कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही पक्ष जनतेला लुटत आहेत़ कुणी २जी घोटाळ्यातून पैसे लाटले तर कुणी कोळसा घोटाळ्यातून पैसे मिळवले़ या पक्षाचे लोक तुमच्यापर्यंत आले नसतील तर, तुम्ही स्वत: त्यांच्या कार्यालयात जा़ आम्ही तुमची वाट  पाहतोय, असे त्यांना सांगा़ गेल्या ६५ वर्षांपासून हे पक्ष आम्हाला लुटत आहेत, आता आपली पाळी आहे, असे केजरीवाल या वेळी म्हणाले़ विशेष म्हणजे त्यांच्या या वाक्यासरशी उपस्थित लोकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला़ भाषणात केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही ताशेरे ओढले़ रामलीला मैदानात मोदींच्या भाषणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही़ त्यांचा अर्धा वेळ मला नक्षली ठरवण्यात आणि माझ्या आंदोलनावर टीका करण्यातच गेला़ वैयक्तिक टीकेचे हे राजकारण योग्य नाही़ राजकारण हे मुद्द्यांवर आधारित असावे, असे ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)