शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर हात उचलताना वाईट वाटलं नाही का? विभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 13:56 IST

Swati Maliwal Assault Case: या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ ऑगस्टला होणार आहे. 

Swati Maliwal Assault Case:  नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना कथितरित्या मारहाण केल्याप्रकरणी विभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. याप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विभव कुमार यांना जामीन मिळाला नाही. तसेच, या याचिकेवर सर्वाच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ ऑगस्टला होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायाधीश उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर विभव कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. विभव कुमार यांच्या वतीने वकील अभिषेक मनू सिंघवी यांना न्यायालयाने काही प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवपदावरून हटवल्यानंतर विभव कुमार हे मुख्यमंत्र्यांच्या घरी काय करत होते, तिथे त्यांचे काय काम होते? असे सवाल सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच, महिलेवर हात उचलताना वाईट वाटले नाही का? असे न्यायाधीश सूर्यकांत यांनी विचारले.

याचबरोबर, तुमच्या अंतर्गत राजकीय वादात आम्ही पडणार नाही. आम्ही फक्त कायद्याचे पालन करू, असे न्यायालयाने म्हटले आहे. तर माझ्या अशिलाविरुद्ध कोणीही काहीही बोलले नाही, असा युक्तिवाद वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. त्यावर न्यायाधीशांनी म्हटले की, त्या घरात उपस्थित असलेल्या कोणत्या कर्मचाऱ्यामध्ये विभव कुमार यांच्या विरोधात वक्तव्य करण्याची हिंमत आहे. 

पुढे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, विभव कुमार ७५ दिवसांपासून तुरुंगात आहेत. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विभव कुमार यांना 'goon' म्हणजेच 'गुंड' असेही संबोधले. अशा 'गुंडांनी' मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात काम करावे का? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने विभव कुमारच्या याचिकेवर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आणि या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख ७ ऑगस्ट निश्चित केली.

दिल्ली पोलीस आरोपपत्र दाखल करणार मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांच्याविरोधात दिल्ली पोलीस आज न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पोलीस तीस हजारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. आरोपपत्र जवळपास २५० पानांचे आहे. दिल्ली पोलीस दुपारी आरोपपत्र घेऊन न्यायालयात पोहोचतील. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAAPआप