शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

सुशीलकुमार शिंदेंकडे काँग्रेस अध्यक्षपद?, गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 5:04 AM

देशभर सध्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत १४० काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधी तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशभर सध्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत १४० काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळाला. विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यास आवश्यक असलेले संख्याबळ यावेळीही काँग्रेसकडे नसल्याने, त्या पदापासूनही पक्षाला वंचित राहावे लागणार आहे. राहुल गांधी यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, म्हणून काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत शशी थरूर व अन्य खासदारांनी केलेली विनंती त्यांनी अमान्य केली.राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारिणीकडे सोपवून महिना उलटला, तरी यावर काँग्रेस कार्यकारिणीने अद्याप तोडगा काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक उद्या, सोमवारी दिल्लीत होत आहे. या बैठकीकडे साºयांचे लक्ष लागले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी निर्णयावर ठाम असून सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा येण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिंदे यांच्याबरोबरच मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, जनार्दन द्विवेदी, ए. के. अ‍ॅन्टोनी, मुकुल वासनिक ही नावे चर्चेत होती. मात्र, सुशीलकुमारांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी पसंतीची मोहोर उमटविल्याचे समजते.गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासूराजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले शिंदे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून, त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्रिपद सांभाळले आहे. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेस