शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

देशाचं नाव बदला! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 19:11 IST

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी

नवी दिल्ली: संविधानात सुधारणा करून देशाचं नाव बदला अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. २ जून रोजी याचिकेवर सुनावणी होईल. देशाचं नाव इंडियाऐवजी हिंदुस्तान किंवा भारत करण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागेल, असं मत याचिकेत व्यक्त करण्यात आलं आहे.संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. हा अनुच्छेद देशाच्या नावाच्या व्याख्येशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून इंडियाच्या जागी भारत/हिंदुस्तान शब्द वापरण्यात यावा, अशी मागणी याचिकेमध्ये आहे. शुक्रवारी याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र सरन्यायाधीश शरद बोबडे अनुपस्थित असल्यानं सुनावणी यादीतून हे प्रकरण वगळण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार २ जून रोजी याचिकेवर सुनावणी होईल. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे याबद्दलचा युक्तिवाद होईल. 'इंडिया शब्दामध्ये वसाहतवादाचा इतिहास आहे. त्यामुळे अनुच्छेदात बदल करून त्याऐवजी भारत किंवा हिंदुस्तान शब्द समाविष्ट करण्यात यावा. त्यामुळे वसाहतवादाच्या इतिहासापासून सुटका होईल', असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. दिल्लीतल्या एका व्यक्तीनं ही याचिका दाखल केली आहे. 'इंडिया हे इंग्रजी नाव प्रतिकात्मक आहे. मात्र ते हटवल्यानं राष्ट्रीयत्वाचा गौरव होईल. येणाऱ्या पिढ्यांवर भारत/हिंदुस्तान शब्दामुळे अतिशय सकारात्मक परिणाम होईल. इंडियाच्या भारत शब्द वापरला गेल्यास देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या पूर्वजांना न्याय मिळेल,' असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्याची मागणी१९४८ मध्ये तत्कालीन प्रस्तावित अनुच्छेद १ वरून संविधान सभेत बरीच चर्चा झाली होती, असा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे. त्यावेळी अनेकांनी देशाचं नाव भारत किंवा हिंदुस्तान असावं, असं मत व्यक्त केलं होतं. आता देशाला मूळ नाव देण्याची वेळ आली आहे. आपल्या देशातल्या शहरांची नावंदेखील बदलली जात आहेत, याकडेही याचिकाकर्त्यानं लक्ष वेधलं आहे.हेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेशकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यातमराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय