चार वर्षे अफेअर, मग हौसेने तिच्याशी लग्न केले; पहिल्या रात्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 11:44 AM2022-05-14T11:44:05+5:302022-05-14T14:42:23+5:30

या प्रकरणातील आश्‍चर्यकारक बाब म्हणजे वधू-वराचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.

suhagraat dulhan denied for s e x love marriage divorce first night after marriage moradabad uttar pradesh | चार वर्षे अफेअर, मग हौसेने तिच्याशी लग्न केले; पहिल्या रात्री म्हणाली...

चार वर्षे अफेअर, मग हौसेने तिच्याशी लग्न केले; पहिल्या रात्री म्हणाली...

Next

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका नववधूने आपल्या मधुचंद्राच्या वेळी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. या प्रकरणातील आश्‍चर्यकारक बाब म्हणजे वधू-वराचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांचेही कुटुंब या नात्यासाठी तयार नव्हते, मात्र प्रेमापुढे घरच्यांनी हार पत्करली आणि थाटामाटात दोघांचे लग्न लावून दिले. पण मधुचंद्राच्या वेळी महिलेनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देईल, या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मधुचंद्राच्या वेळी नववधूनं आपल्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बिलकुल आवडत नसल्याचं आपल्या पतीला सांगितलं. परंतु सुरूवातीला त्याला ती आपली मजा करत असल्याचं वाटलं. परंतु आपण कोणत्याही परिस्थितीत शारीरिक संबंध ठेवणार नाही, कारण आपल्याला ते आवडत नाही असं तिनं सांगितलं. हे ऐकून नवऱ्या मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला.

पंचायतीतही गेलं प्रकरण
हे प्रकरण पंचायतीतही सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु वधू आपल्या भूमिकेवर ठाम होती. यानंतर कुटुंबीयांनी तिला कौन्सिलिंगसाठीही नेलं. परंतु त्यानंतरही ती आपल्या भूमिकेवरच ठाम राहीली. यानंतर दोघांनीही आपलं नातं इकडेच थांबवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुलीला डॉक्टरांकडेही नेण्यात आलं. उपाचारानंतर ती आपल्या माहेरी गेली. त्यावेळी तिनं आपल्याला आईला आपल्याला संबंधांची भिती वाटत असल्याचं सांगितलं. तसंच आपल्याला परत जायचं नसल्याचंही ती म्हणाली. डॉक्टरांनीही तिला समजावलं. ३ ते ४ महिने उपाचरही सुरू होते. पण तरीही तिनं आपली भूमिका सोडली नाही.

दोघंही झाले विभक्त
कौन्सिलर रुतू नारंग यांनी मुलगी थोडी मेंटल इन बॅलन्स वाटल्याचं म्हटलं. कारण पहिल्यांदा ती प्रेमासाठी अडून बसली, त्यानंतर तिनं लग्नाची मागणी केली आणि नंतर विभक्त होण्यावर अडून बसली असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांना त्यांनी अन्य डॉक्टरकडे दाखवण्याचा सल्लाही दिला. सध्या दोघेही परस्पर सहमतीनं विभक्त झाले आहेत.

Web Title: suhagraat dulhan denied for s e x love marriage divorce first night after marriage moradabad uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app