शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

'अपघात नाही तर 'ही' हत्या! माझी मुलगी कधीच परत येणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:10 PM

टोळक्याच्या छेडछाडीपासून स्वत: ला वाचवण्याच्या प्रयत्नात सुदीक्षाचा अपघात झाला. यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा सुदीक्षाच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेत शिक्षण घेणारी तरुणी उत्तर प्रदेशमध्ये छेडछाडीची बळी ठरली. सुदीक्षा भाटी असं या तरुणीचं नाव असून स्वत:च्या मेहनतीने तिने अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवली होती. टोळक्याच्या छेडछाडीपासून स्वत: ला वाचवण्याच्या प्रयत्नात सुदीक्षाचा अपघात झाला. यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा सुदीक्षाच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

सुदीक्षाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हा रस्ते अपघात असल्याची तक्रार दाखल केली आहे. यावर तिच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून हा केवळ अपघात नाही तर ही हत्या असल्याचं म्हटलं आहे. सुदीक्षाचे वडील जितेंद्र भाटी यांनी "माझ्या मुलीची हत्या झाली आहे. मला माहीत आहे की आता माझी मुलगी कधीच परत येणार नाही. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे" असं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुदीक्षा अमेरिकेच्या 'बॉब्सन'मध्ये अभ्यास करत होती. बुलंदशहरच्या गौतमबुद्ध नगरच्या दादरीमध्ये सुदीक्षाचं कुटुंब स्थायिक आहे. सुदीक्षाचे वडील एक ढाबा चालवतात. ती अमेरिकेत शिक्षण घेते होती मात्र सध्या कोरोना काळात आपल्या घरी परतली होती. ऑगस्टमध्ये ती पुन्हा अमेरिकेला परतणार होती. मात्र त्याआधीच  छेडछाडीच्या घटनेत तिला जीव गमवावा लागला आहे.

रिपोर्टनुसार, सुदीक्षा आपल्या एका नातेवाईकांसोबत बाईकवरून आपल्या मामाच्या घरी निघाली होती. या दरम्यान काही टवाळखोरांनी त्यांच्या बाईकचा पाठलाग केला आणि छेडछाड सुरू केली. त्यांनी अनेकदा सुदीक्षाच्या बाईकला ओव्हरटेकही केलं. याच दरम्यान समोरच्या बाईकला धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुदीक्षा गंभीररित्या जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. 

सुदीक्षा भाटी अमेरिकेच्या 'बॉब्सन'मध्ये अभ्यास करत होती. 2018 मध्ये तिने सीबीएसई बोर्डच्या इंटरमीडिएटमध्ये बुलंदशहर जनपदमध्ये 98 टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केलं होतं. तिच्या या यशामुळे तिला 3 कोटी 80 लाखांची स्कॉलरशिप मिळाली. यानंतर सुदीक्षा अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली होती. मात्र या घटनेनंतर यूपीत टवाळखोरांचा उच्छाद पाहायला मिळाला आहे. तसेच महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी

"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी

बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक

कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो

लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात

बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले

यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसAmericaअमेरिकाIndiaभारतCrime Newsगुन्हेगारी