Join us  

T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू

USA Team For World Cup 2024: जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 12:46 PM

Open in App

T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ साठी यजमान अमेरिकेचा संघ जाहीर झाला आहे.अमेरिकेने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून, मोनांक पटेलकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेला क्रिकेटपटू उन्मुक्त चंदला मात्र संघात स्थान मिळाले नाही. मात्र, न्यूझीलंडसाठी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणाऱ्या कोरी अँडरसनला संधी मिळाली आहे.  तो २०१५ मध्ये फायनल खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाचा हिस्सा आहे. 

अँडरसन संघाचा भाग असताना अमेरिकेने कॅनडाचा पराभव केला होता. त्याची संघात एन्ट्री झाल्यामुळे यजमान संघ अधिक मजबूत झाल्याचे दिसते. विशेष बाब म्हणजे भारताला अंडर-१९ विश्वचषक जिंकवून देणारा उन्मुक्त चंद या स्पर्धेला मुकला आहे. त्याला अमेरिकेच्या संघात स्थान मिळाले नाही. भारताचा अंडर-१९ स्टार सौरभ नेत्रावाकरला देखील संघात स्थान मिळाले आहे. त्याने २४ ट्वेंटी-२० सामन्यांत २४ बळी घेतले आहेत. 

विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ -मोनांक पटेल (कर्णधार), एरोन जोन्स, एंड्रीज गौस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेथ्रालवकर, शॅडली वान शल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.राखीव खेळाडू - गजानंद सिंह, जुआनॉय ड्रायस्डेल, यासिर मोहम्मद. 

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - 

अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अमेरिकाउन्मुक्त चंद