शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 12:05 PM

Baramati Loksabha Election - प्रचार काळात ज्या ज्या लोकांनी मी भेटले, त्यांच्या डोळ्यात आस होती, त्यांच्यासाठी मी काहीतरी करेन, जनतेचा हा विश्वास मला बळ देत होते. आगामी काळात जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी काम करेन असा विश्वास महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी जनतेला दिला. 

पुणे - Sunetra Pawar Speech ( Marathi News ) गेल्या एक महिन्यापासून मी मतदारांना भेटतेय, त्या मतदारांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मी ऐकत होते, मला या मतदारसंघाची जबाबदारी देऊन महायुतीने जो विश्वास दाखवला, तो मी माझ्या कामातून जनतेच्या साथीने नक्कीच सार्थ करून दाखवेन असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातील जनतेला केले आहे. 

वारजे येथे महायुतीच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादांना आपण सगळेच ओळखता, त्यांच्या कामाचा धडाका, आवाका आणि कामाची पद्धत, त्यांनी दिलेला शब्द या सगळ्यांवर आपल्या सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळे जनता अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपल्या विकासासाठी नक्की काय करायला हवं, भविष्यासाठी आणि तळागाळातील लोकांच्या हितासाठी काय गरजेचे होते हे दादांनी ओळखलं, त्यातून त्यांनी मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकार अतिशय उत्तम प्रकारे काम करताना आपण पाहतोय. गेल्या १० वर्षात मोदींनी भारताचं नाव ज्या उंचीवर पोहचवलं आहे. त्यांचे धाडसी निर्णय, अफाट काम त्यामुळे जनतेचा मोदींवरील आत्मविश्वास वाढलेला आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच जनता मोदींच्या मागे एकवटून उभी राहिली असून आपणही भविष्यासाठी, सक्षम भारतासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे. महायुतीने जी मला बारामतीची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून जास्तीत जास्त मतदान करावे ही आपल्या सर्वांना माझी विनंती आहे असंही सुनेत्रा पवारांनी जनतेला आवाहन केले. 

दरम्यान, मतदारसंघात मी प्रचाराला फिरत होते, त्यावेळी माझ्या माता भगिनी, युवक, वृद्ध माणसे, सगळे लोक मला उत्साहाने मला भेटत होते. त्यांच्या मनात आणि डोळ्यात एकप्रकारची आस होती. ही आस मला आत्मविश्वास आणि लढण्याचं बळ देत होते. आगामी काळात मी त्यांच्यासाठी काही तरी करावं. आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत. माझ्या युवकांच्या हाताला काम, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार, माझा शेतकरी राजा कसा सुखी होईल यासाठी जे जे काही करण्याची धमक आणि माझा संपूर्ण मतदारसंघ कसा समृद्ध होईल हे माझे ध्येय असणार आहे. त्यामुळे ७ तारखेला जास्तीत जास्त मतदान करून मला संधी द्यावी असंही सुनेत्रा पवारांनी जनतेला सांगितले.  

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारbaramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार