Join us  

...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण

Ricky Ponting News : बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 1:07 PM

Open in App

Ricky Ponting On Team India Coach : जूनमध्ये होणारा ट्वेंटी-२० विश्वचषक संपताच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंगने एक मोठे विधान करून क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा प्रशिक्षक असणाऱ्या पाँटिंगने टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास नकार दिल्याचे कळते.

रिकी पाँटिंगने सांगितले की, त्याचा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रस होता. पण, सततच्या क्रिकेटमुळे त्याने या पदासाठी नकार देत कुटुंबीयांसाठी वेळ घालवण्यास प्राधान्य दिले. टीम इंडियाच्या प्रशिक्षकाला वर्षातून जवळपास १० ते ११ महिने संघासोबत वेळ घालवावा लागतो. त्यामुळे या पदावर असलेला व्यक्ती आयपीएलमध्ये कार्यरत राहू शकत नाही. पाँटिंग 'आयसीसी'शी बोलत होता.

"मला कोणत्याही राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्यास आवडले असते. पण माझ्या जीवनात इतरही काही बाबी आहेत. मला आता कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा आहे. याशिवाय भारताचा प्रशिक्षक झाल्यास मी आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला मार्गदर्शन करू शकणार नाही", असेही रिकी पाँटिंगने नमूद केले. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हरभजन या पदासाठी अर्ज करतो का हे पाहण्याजोगे असणार आहेत. भज्जीशिवाय गौतम गंभीर, महिला जयवर्धने आणि चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची देखील या पदासाठी नावे चर्चेत आहेत.

BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे. - प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआॅस्ट्रेलियाआयसीसी