Join us  

राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 1:00 PM

राजकुमार रावनेही त्याच्या स्टाईलमध्ये गजगामिनी वॉक करत सर्वांना हसवलं आहे.

अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या सौंदर्यावर सर्वच फिदा आहेत. सध्या गाजत असलेल्या संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेबसीरिजमधील तिचा 'गजगामिनी वॉक' व्हायरल होतोय. आदितीची ही चाल आता नेटकरीही कॉपी करताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेता राजकुमार रावनेही (Rajkumar Rao) त्याच्या स्टाईलमध्ये गजगामिनी वॉक करत सर्वांना हसवलं आहे. जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) त्याचा हा व्हिडिओ शेअर केलाय.

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमात दिसणार आहेत. सिनेमाच्या शूटदरम्यानचा एक बीटीएस व्हिडिओ जान्हवीने शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी कपूर हातात बॅट घेऊन क्रिकेट पीचवर दिसत आहे. तर तिच्यासमोर राजकुमार राव हलत डुलत चालत आहे. या व्हिडिओसोबत जान्हवीने कॅप्शन देत लिहिले, 'हा आमचा गजगामिनी वॉक. त्या सर्व क्रिकेट अॅक्सेसरीजची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागला पण मिस्टर माही मला आनंद आहे की मी तुझं मनोरंजन केलं.'

राजकुमारची ही हटके वॉकिंग स्टाईल पाहून नेटकरी खळखळून हसले आहेत.  'आजकाल प्रत्येक राजकुमार बिब्बोजानचा चाहता आहे' अशी  कमेंट नेटफ्लिक्सने केली आहे. 'राजकुमारचा वॉक करण्याची स्टाईल थोडी कॅज्युअल आहे' अशी कमेंट झी स्टुडिओजने केली आहे. 

राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा ३१ मे रोजी रिलीज होतोय. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी सर्वांच्याच पसंतीस पडली आहेत. यामध्ये जान्हवी क्रिकेट खेळताना दिसते. तिने २ वर्ष याचं प्रशिक्षण घेतलं कारण सिनेमात व्हीएफएक्सचा वापर नको अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. 

टॅग्स :राजकुमार रावजान्हवी कपूरआदिती राव हैदरीसोशल मीडिया