Join us  

IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न

Virat Kohli One ground two heartbreaks, IPL 2024 : क्रिकेटचा किंग मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीसोबत घडला दुर्दैवी योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:23 PM

Open in App

Virat Kohli One ground two heartbreaks, IPL 2024 : भारतात सध्या IPLच्या हंगामातील शेवटचा टप्पा सुरु आहे. प्ले-ऑफ्सच्या पहिल्या सामन्यात कोलकाता संघ फायनलमध्ये पोहोचला. त्यानंतर RCB ला नमवून राजस्थानने पुढील फेरी गाठली. आता राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. त्यातील विजेता संघ कोलकाताशी अंतिम फेरीत खेळेल. बंगळुरूच्या संघाने जीवाचे रान करून प्ले-ऑफ्सचे स्थान पटकावले होते. पण त्यांना बाद फेरीचा सामना जिंकता आला नाही आणि पुन्हा एकदा विराट कोहलीचे IPL ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न भंगले. दोन वर्षात एकाच मैदानाने विराट कोहलीला पदरी दोन जिव्हारी लागणारे पराभव दिले. या दुर्दैवी योगायोगाची चर्चा होत आहे.

IPL 2024 Playoffs RCB vs RR-

IPLच्या यंदाच्या हंगामात पहिल्या 8 पैकी 7 सामने हरल्यानंतर सलग 6 विजय मिळवून RCB ने प्ले-ऑफ्स मध्ये प्रवेश मिळवला होता. याऊलट राजस्थानचा संघ गेल्या 4 सामन्यात पराभूत झाला होता. त्यामुळे RCB अधिक बलवान संघ मानला जात होता. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. RCB ने प्रथम फलंदाजी करताना 172 धावा केल्या. हे आव्हान राजस्थानने सहज पार केले आणि RCBचा संघ स्पर्धेबाहेर झाला. त्यामुळे IPL ची ट्रॉफी उंचावण्याचे विराटचे स्वप्न भंगले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विराटला हा पराभव पचवावा लागला.

ODI World Cup Final 2023 IND vs AUS-

दुर्दैवी योगायोग म्हणजे, गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरलादेखील याच मैदानावर विराटला असाच एक पराभव पचवावा लागला. तो पराभव केवळ विराटच नव्हे तर संपूर्ण भारताच्या जिव्हारी लागला. तो सामना होता वन-डे विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना. भारताच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत रंगली होती. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये भारताने एकही सामना हरला नव्हता, पण त्या सामन्यात भारताची गाडी रूळावरून घसरली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 240 धावा केल्या. विराटने त्यावेळी 54 धावांची खेळी केली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने 137 धावांची दमदार खेळी करून भारताला 6 गडी राखून पराभूत केले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच विराटला दोन जिव्हारी लागणारे पराभव पचवावे लागले. दोन वर्षात एकाच मैदानाने दोन वेळा विराट कोहलीचे विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न तोडले.

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीनरेंद्र मोदी स्टेडियमवन डे वर्ल्ड कपरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर