शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही

By विकास राऊत | Updated: May 23, 2024 13:06 IST

पॅकेजच्या घोषणेला झाले नऊ महिने; स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींद्वारे भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेला नऊ महिने झाले. या कामांप्रकरणी अध्यादेश काढण्याशिवाय काहीही तरतूद शासनाने केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील विसर पडला. 

स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार? लाेकसभा निवडणूक निकालानंतर विधानसभेची तयारी सुरू होईल. त्यातही अर्थसंकल्प नसणार आहे. त्यामुळे सरकार मराठवाड्याला कधी पावणार? असा प्रश्न आहे. ४५ हजार कोटी सर्व विभागांचे व १४ हजार ४० कोटी पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी स्वतंत्र तरतुदीच्या घोषणेसह सुमारे ५९ हजार कोटींचे ते पॅकेज होते.

कोणत्या विभागासाठी काय केल्या घोषणा ?जलसंपदा - २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये,सार्वजनिक बांधकाम - १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख,पशुसंवर्धन, दुग्धविकास,मस्त्यव्यवसाय- ३ हजार ३१८ कोटी ५४ लाख,नियोजन - १ हजार ६०८ कोटी २८ लाख,परिवहन - १ हजार १२८ कोटी ६९ लाख,ग्रामविकास - १ हजार २९१ कोटी ४४ लाख,कृषी विभाग - ७०९ कोटी ४९ लाख,क्रीडा विभाग - ६९६ कोटी ३८ लाख,गृह - ६८४ कोटी ४५ लाख,वैद्यकीय शिक्षण - ४९८ कोटी ६ लाख,महिला व बालविकास - ३८६ कोटी ८८ लाख,शालेय शिक्षण - ४९० कोटी ७८ लाख,सार्वजनिक आरोग्य - ३५.३७ कोटी,सामान्य प्रशासन- २८७ कोटी,नगर विकास- २८१ कोटी ७१ लाख,सांस्कृतिक कार्य- २५३ कोटी ७० लाख,पर्यटन - ९५ कोटी २५ लाख,मदत पुनर्वसन - ८८ कोटी ७२ लाख,वनविभाग - ६५ कोटी ४२ लाख,महसूल विभाग- ६३ कोटी ६८ लाख,उद्योग विभाग- ३८ कोटी,वस्त्रोद्योग -२५ कोटी,कौशल्य विकास-१० कोटी,विधी व न्याय- ३ कोटी ८५ लाख

१४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद...मराठवाड्यासाठी पश्चिमी वाहिन्यांतून पाण्यासाठी स्वतंत्र १४ हजार ४० कोटींची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली. गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. अवकाळी पावसाने मराठवाड्याला तडाखा दिला. सध्या मराठवाड्यात पाणीटंचाई आहे. जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा १ महिना उशीर केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिमी वाहिन्यांतील पाणी मराठवाड्याला मिळावे, यावर २०१४ पासून सर्व सत्ताधाऱ्यांनी वारंवार घोषणा केल्या. त्यात १४ हजार ४० कोटींच्या स्वतंत्र घोषणेची भर पडली. याबाबत ठोस अशी काहीही हालचाल झाली नाही.

पावसाळी अधिवेशनानंतर मिशन इलेक्शन?जलसंपदा विभागाला २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये, तर सार्वजनिक बांधकामाला १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख रुपयांची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत केली. ४५ पैकी ३४ हजार ५१८ कोटी या दोन विभागांसाठीच दिले. उर्वरित १० हजार ४८२ पैकी ७ हजार ८६ कोटी जिल्हानिहाय विविध योजनांसाठी घोषित केले. ३३९६ कोटी इतर कामांसाठी आहेत. जलसंपदाचा मागील अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही. तर बांधकाम विभागाचे सुमारे ५ हजार कोटींचे देणे शिल्लक आहे. पावसाळी अधिवशेनानंतर राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असेल. साधारणत: ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे या पॅकेजची घोषणा ही घोषणाच ठरणार अशी चर्चा आहे.

जिल्हानिहाय घोषणा अशाछत्रपती संभाजीनगर : २ हजार कोटीधाराशिव : १ हजार ७१९ कोटीबीड : १ हजार १३३ कोटीलातूर : २९१ कोटीहिंगोली : ४२१ कोटीपरभणी : ७०३ कोटीजालना : १५९ कोटीनांदेड : ६६० कोटीएकूण : ७ हजार ८६ कोटी

अध्यादेश काढले आहेतमंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. अनुदान तरतुदीबाबतही काही निर्णय झाले आहेत. येणाऱ्या काळात तरतूद होऊन कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.-- मधुकरराजे अर्दड, विभागीय आयुक्त

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग